आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत पावसाचा जोर ओसरत असल्याने यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यात येणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. पाऊस वाढल्यास शिवाजी पार्कवर चिखल झाला तर सोबतच षण्मुखानंद हाॅलचा पर्याय समोर असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

शिवसैनिकांना सतत प्रेरित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली होती. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचे सोने कानात साठवून ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर उपस्थित असत. भर पावसातही शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे भाषण मन देऊन ऐकलेले आहे. आतापर्यंत केवळ एकदाच दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. २००६ मध्ये प्रचंड पाऊस पडल्याने मैदानात चिखल झाला होता त्यामुळे मेळावा रद्द केला २००९ मध्ये विधानसभा निवडणुका असल्याने मेळाव्याऐवजी युतीची संयुक्त सभा झाली होती. गेल्या वर्षी पावसामुळे वर्धापनदिन रद्द करावा लागला होता. मात्र यंदा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार
मराठाआरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका निश्चित असून उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात ती जाहीर कणार आहेत. बाळासाहेब ठाकरे आर्थिक आरक्षण द्यावे, असे सांगत तुमचीही तीच भूमिका आहे का? असे विचारता उद्धव यांनी दसरा मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगितले. यासोबतच मनपा निवडणुकीबाबत उद्धव शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...