आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Unveils Vision Document; Promises Participatory Manifesto

मनसेच्या ब्ल्यू प्रिंटआधीच शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांची स्वप्नातील ब्ल्यू प्रिंट सादर होण्यापूर्वीच शिवसेनेने विधानसभेच्या तोंडावर आपल्या पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट गुरुवारी सादर करून बाजी मारली आहे. शिवसेना भवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 13 जिल्हाप्रमुखांशी संवाद साधण्याच्या हायटेक यंत्रणेचाही याचवेळी शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे मित्रपक्षाच्या आधीही आपल्या पक्षाचा ‘जाहीरनामा’ सादर करत ठाकरेंनी भाजपवरही कडी केली.

ठाकरे म्हणाले की, महापालिकांच्या शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमला आम्ही सुरुवात केली होती. त्याला मिळालेले यश पाहूनच राज्यातील शिवसेनेच्या सर्व नेते आणि पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी व्हीसीचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याचा आम्ही विचार केला आणि आता याची सुरुवात करीत आहोत. लवकरच राज्यातील अन्य भागांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करून नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीशीही व्हीसीद्वारेच चर्चा करण्यात येईल.

‘दिव्य मराठी’शी बोलताना उद्धव म्हणाले, विविध मान्यवरांच्या कल्पना घेऊन आम्ही हे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. मात्र डॉक्युमेंट अजूनही पूर्णपणे तयार नसून यामध्ये लवकरच अनेक घटकांचाही समावेश करणार आहोत. राज्याच्या विकासासाठी अशा योजनांची आवश्यकता आहे. योजना असतील तरच त्यावर काम करता येईल, त्यामुळेच आम्ही हे व्हिजन डॉक्युमेंट तयार केलेले आहे. यामुळे महाराष्ट्र खरोखर नंबर वनचे राज्य नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

औरंगाबादला पर्यटन तर नाशिकला धार्मिक हब बनवणार
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक
- छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉक थ्रू म्युझियम
- रेसकोर्स येथे मनोरंजन मैदान
- बंद पडलेले उद्योग सुरू करणार
- कापूस, ऊस उत्पादकांना सर्व सोयी
- कृषी क्षेत्रासाठी वेगळा अर्थसंकल्प
- ब्रिटिशांच्या काळातील पीक आणेवारीची पद्धत रद्द करणार
- पोलिसांची भरती, त्यांच्या घराचा प्रश्न सोडविणार
- मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न
- औरंगाबाद- टुरिझम हब
- नाशिक- रिलिजियस हब
- अमरावती- अ‍ॅग्रिकल्चर हब
- सोलापूर- एक्साइज हब
- पुणे- एज्युकेशनल हब
- नागपूर- ट्रान्सपोर्ट हब विकसित करणार