आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलिंगकरांशी संधान : संघातील बंडाळीवर पोळी, शिवसेनेची गोव्यात खेळी !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाशी फारकत घेऊन गोव्याचा स्वतंत्र संघ काढणारे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांची पणजीत भेट घेऊन शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी दीड तास चर्चा केली. संघ नेतृत्वाला आव्हान देऊन वेगळी चूल मांडणाऱ्या वेलिंगकरांच्या भूमिकेला शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून पाठिंबा दिला होता. त्यापाठोपाठ ही भेट झाल्याने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेलिंगकरांच्या साथीने शिवसेना वेगळी राजकीय समीकरणे मांडण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत मिळत आहेत.

पणजी येथील हाॅटेल फिडाल्गोमध्ये उभय नेत्यांत दीड तास चर्चा झाली. विशेष म्हणजे या भेटीआधी संजय राऊत यांनी गोव्यातील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेलिंगकरांच्या बंडाचा शिवसेनेला राज्याच्या राजकारणात शिरकाव करण्याच्या दृष्टीने चांगला फायदा होऊ शकतो, असे मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शिवसेनेने सध्या राऊत यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आगामी निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणाचे संकेत
बातम्या आणखी आहेत...