आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन बाबर मनसेत जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मावळ मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने नाराज शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी अखेर मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी त्यांचा पक्ष प्रवेश होईल. आगामी विधानसभा निवडणुकीत बाबर यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन मनसेने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मावळचे खासदार बाबर यांना डावलून शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या बाबर यांनी नेतृत्वाच्या या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता अखेर त्यांनी पक्षातून बाहेर पडून मनसेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.