आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivaji Coronation Ceremony Completed In Grand Style

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; रायगड शिवरायांच्या गजराने दुमदुमला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - ज्या किल्ल्यांवर एकही लढाई झाली नाही अशा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु जिथे जिवंत इतिहास घडला त्या महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी निधी दिला जात नाही. म्हणूनच सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी शिवभक्तांच्या ताकदीच्या जोरावर ते वाकल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.
किल्ले रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी ते बोलत होते. अपूर्व उत्साह आणि जल्लोषी वातावरणात महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या शिवभक्तांनी शिवरायांना अभिवादन केले. सकाळपासूनच राजसदरेवर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर शाहिरांचा डफ कडाडला. समोरील मंडपामध्ये गर्दी मावेनाशी झाली. शिवभक्तांनी मिळेल तिथे बैठक मारली. नाशिकच्या यशवंत गोसावी यांनी खणखणीत भाषेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सकाळी साडेदहा वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले आणि शिवभक्तांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही.
शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या निनादात संभाजीराजे यांनी मेघडंबरीतील शिवपुतळ्यास पुष्पहार घातला व पालखीला अभिवादन केले. यानंतर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला समितीचे उपाध्यक्ष संजय पवार, कॅ. शिवाजीराव महाडकर, विकास पासलकर, जिल्हाधिकारी एच.के. जावळे, जिल्हा पोलिसप्रमुख रावसाहेब शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रायगडावर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते.
संभाजीराजे आक्रमक
आजच्या या सोहळ्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी अतिशय आक्रमक भाषेत राज्यकर्त्यांना टीकेचे लक्ष केले. या उत्सवाला सहकार्य करायचे सोडून येथे जमावबंदी जाहीर केली गेली. यापुढच्या काळात जर शिवभक्तांना शासनाकडून त्रास झाला तर आता मी म्यानातून तलवार बाहेर काढली आहे.
उत्साहाला उधाण
किल्ल्यावरील कठड्यांवर भगवे ध्वज लावल्याने वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती. रिमझिम पावसामध्ये लहरणारे हे भगवे ध्वज गडावर सर्वत्र दिसणारे ऐतिहासिक वेशातील शिवभक्त सर्वांचे आकर्षणाचे स्थान बनले होते.
बंदी झुगारून रायगडावर बसवले पंचधातूचे छत्र
शिवाजी स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा