आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji Maharaj Memorial Very Soon Sanctioned Envrionment Minister Javadekar

समुद्रातील शिवस्मारकाला लवकरच मंजुरी, केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी गिरगाव चौपाटीपासून तीन किलोमीटरवर १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आली आहे. या स्मारकाला पर्यावरणविषयक मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर याला मान्यता देण्यात येईल, असे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

केंद्रीय पर्यावरणमंत्री, पर्यावरण अधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. त्या वेळी जावडेकर बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह अधिका-यांची उपस्थिती होती.

शिवाजी स्मारकाला पर्यावरणविषयक मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर मान्यता देण्यात येईल. स्मारकाच्या जागेवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, मेरिटाइम बोर्ड आणि आयआयटी पवई यांचे अन्वेषण आणि सर्वेक्षणाचे काम प्रगतिपथावर असल्याचेही जावडेकर म्हणाले.

चैत्यभूमीचे सुशोभीकरण लवकरच करणार
कोट्यवधी आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या दादरच्या चैत्यभूमीच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुस-या आणि तिस-या टप्प्याचे काम सीआरझेडच्या नियमावलीमुळे थांबले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास चैत्यभूमीला चांगले स्वरूप प्राप्त होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या
वेळी सांगितले.