आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आग्र्याला जाण्यापूर्वी औरंगाबादेेत थांबले होते शिवाजी महाराज, तुम्‍ही पाहिले नसतील हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या आग्र्यातल्या महालातून स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेला आज आज 17 ऑगस्‍टला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. मे 1666 मध्‍ये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना कैद करण्यात आले होते. ते चार महिने मुघलांच्या नजर कैदेत होते. महाराजांनी आजारपणाचे नाटक करून अनेक दिवस फळांचे पेटारे दान म्हणून पाठवत असल्याचा बनाव रचला. एका फळांच्या पेटाऱ्यातून मुघल सैनिकांच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्र गाठला. यानिमित्‍त आम्‍ही आपल्‍याला दाखवत आहोत शिवाजी महाराज यांचे अत्‍यंत दुर्मिळ फोटो.
राजपूत पत्रांवरुन 18 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराज बादशहा औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले. आलमगीरनामामध्ये शिवाजी महाराजांच्या सुटकेची तारिख 19 ऑगस्ट देण्यात आली आहे. त्यामागे कारण असे, की शिवाजी महाराज दिसेनासे झाल्याने मोगलांनी दिवसभर शोध घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आग्र्यातून बाहेर पडल्याचे जाहिर केले. शिवाजी महाराज आग्र्यात असताना राजपूतांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. या तारखेमुळे शिवाजी महाराजांच्या सुटकेची नेमकी कल्पना राजपुतांना होती, असेही समोर येते.
महाराजांची बरीचशी चित्रे विदेशात..
छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी काढलेली देखणी चित्रे आज उपलब्ध आहेत. त्‍यापैकी बरीचशी चित्रे ही विदेशात आहेत. महाराजांच्‍या काही चित्रांवर तारखांचा उल्‍लेख नाही. मात्र, संग्रह करणा-याने केलेल्‍या लिखाणाच्‍या आधारावर या चित्रांचा काळ ठरवतो येतो. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com या संग्रहातून आपल्‍याला महाराजांची विविध चित्रे दाखवणार आहे.
- 1672 च्या दरम्‍यान मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाहांची चित्रे तयार केली.
- ही चित्रे त्‍यांनी मीर महम्मद कडून तयार केली होती.
- या संग्रहात एक चित्र शिवाजी महाराज यांचेही होते.
- मनुचीने घेतलेले चित्र सध्‍या पॅरीसमध्‍ये आहे.
- शिवाजी महाराज यांची विविध चित्रे विदेशात आहेत.
- राजस्‍थानमध्‍ये राजपुती शैलीत काढलेले चित्र, टाटा कलेक्शनमधील, फ्रांसच्या राष्ट्रीय
ग्रंथालयातील व बर्लिन स्टेट लायब्ररीतील चित्रे प्रसिद्ध आहेत.
1) वरील चित्र ब्रिटिश म्युझियममधील आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शिवरायांची अत्‍यंत दुर्मिळ अशी चित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...