आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे असेल समुद्रातील भव्य शिवस्मारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारणीस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नाहरकत दिल्यामुळे आता हे स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जगातले सर्वात उंच असे अरबी समुद्रातले शिवस्मारक उभारण्याच्या प्राथमिक खर्चासाठी तत्कालीन आघाडी सरकारने शंभर कोटींची तरतूद केली आहे.

नरिमन पॉईंटपासून समुद्रात अडीच किमीवर पाण्याखाली असलेल्या चाळीस एकर इतक्या विस्तीर्ण खडकावर १९० मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा हा पुतळा असणार आहे. या प्रकल्पाचा सागरी पर्यावरणावर होणा-या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यात
आला आहे. गोव्याच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ओशियानोलॉजी आणि राष्ट्रीय पर्यावरण संस्थेने(नीरी) या दोन संस्थांनी तयार केलेला हा अभ्यास अहवाल महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीने केंद्रीय पर्यावरण खात्याकडे मंजूरीसाठी पाठवला होता. इतर प्रक्रिया व अडथळे पार केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्याने या कामाला लवकरच वेग येईल.

स्मारकाची वैशिष्ट्ये
- जगातला सर्वात उंच अश्वारूढ पुतळा असून त्याची उंची 190 मीटर म्हणजेच 632 फूट इतकी असेल. अमेरिकेच्या
स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याची उंची 309 फूट असून त्याच्या दुप्पट उंचीचा हा पुतळा असेल.
- शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनांची माहिती देणारे कलादालन
- वेगवेगळ्या आकाराचे दोन थिएटर्सही उभारणार
- एक्झिबिशन सेंटर
- जगातले सर्वात मोठे सागरी मत्स्यालय
- महाराजांचा जीवनपट आणि महाराष्ट्राचा इतिहास उलगडणारा लेझर शो
- सर्व सुविधा असलेले उद्यान