आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंटची परवानगी अखेर रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसे, भाजप  आणि शिवसेना यांच्यात दादरच्या शिवाजी पार्कात ‘सेल्फी पॉइंट’ उभारण्याबाबतचे नाट्य शनिवारी संपुष्टात आले. यापुढे शिवाजी पार्कात कोणालाही येथे सेल्फी पॉइंट उभारता येणार नाही, अशी भूमिका आता पालिकेने घेतली अाहे. मात्र, तिन्ही राजकीय पक्षांच्या ‘सेल्फी’श वादात दादरच्या तरुणाईला मात्र हकनाक एका रमणीय जागेस मुकावे लागले.    
 
दादरच्या शिवाजी पार्क वाॅर्डात मनसेचे संदीप देशपांडे नगरसेवक होते. त्यांच्या कल्पकतेतून येथे २०१२ मध्ये सेल्फी पॉइंट उभारला गेला. मात्र, या वेळी त्यांच्या पत्नी स्वप्ना यांचा या वाॅर्डातून पराभव झाला. देखभालीच्या खर्चाचे कारण पुढे करत पत्नीच्या पराभवामुळे संतापलेल्या देशपांडे यांनी सेल्फी पॉइंट काढून टाकला.    

त्यानंतर लगोलग मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजप सेल्फी पॉइंट उभारेल, असे टि्वट  केले. दोन तासांत पालिकेने भाजपच्या सेल्फी पाॅइंटला परवानगीसुद्धा दिली. सेल्फी वादात भाजपला लाभ होत असल्याचे पाहून शिवसेननेही येथे सेल्फी पॉइंटसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे चांगलेच राजकारण तापले होते.

ज्येष्ठ नागरिकांचा संताप  
सेल्फीची जागा आमच्या माॅर्निंग आणि इव्हनिंग वाॅकच्या ट्रॅकवर आहे. तीन, तीन सेल्फी उभारल्यास आम्ही चालायचे तरी कसे, असे कारण पुढे करत त्यांनी सेल्फी पॉइंट नको, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली.   त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शिवाजी पार्कवर यापुढे सेल्फी पॉइंट असणार नसल्याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...