आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivasena Mo Sanjay Raut Attack On Chandorkar & Congress Dirty Politics

\'भारतरत्न पुरस्कार चांदोरकरांच्या आजोबांची संपत्ती नाही जी काढून घेतली जावी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिला गेला भारतरत्न पुरस्कार हा काही जनार्दन चांदोरकरांच्या आजोबांची संपत्ती नाही, जी त्यांनी म्हटले की काढून घ्यावी. लतादीदींनी पाच पिढ्या घडविल्या आहेत. तसेच त्या भगवंताच्या हातातील वीणा आहेत, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांदोरकरांवर सडकून टीका केली आहे. उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांना ‘पद्म’ पुरस्कार नाही द्यायचे तर काय पाकिस्तानच्या कलाकारांवर ‘पद्म’ पुरस्कारांची खैरात करायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणा-या गुणी व्यक्तींना भारत सरकार भारतरत्न, पद्म यासारखे पुरस्कार देऊन गौरव करते व समाजात त्यांच्यासारखी रत्ने तयार व्हावीत हे यामागचा उद्देश असतो. मात्र, देशातील सरकार हे कोणत्याही पक्षाचे व त्यांच्या नेत्यांचे नसते. त्यामुळे लतादीदींचा कोणी सोम्या-गोम्यांनी पुरस्कार काढून घ्यायचा सवालच उपस्थित होत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
वाचा, आणखी पुढे...