आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सच्या मोफत सेेवेने सरकारी कंपन्याही बुडतील, शिवसेनेचे खासदार सावंत यांना भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्सच्या मोफत सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याची शक्यता अाहे. असे झाल्यास या क्षेत्रात फक्त रिलायन्स कंपनीच राहील आणि इतर सरकारी तसेच खासगी कंपन्या बुडीत निघतील. केंद्र सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार महानगर टेलिफाेन निगमचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी ट्विटरवर व्यक्त केली.

रिलायन्सच्या मोफत काॅल्स सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राला हादरा बसणार असून यात सरकारी कंपन्या जिवंत राहतील का अशी भीती अाहे. सदर घोषणेकडे ‘ट्राय’ क्रांतीच्या स्वरूपात बघत असेल तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएल एमटीएनएल या कंपन्यांनाही अापल्या ग्राहकांना माेफत सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी. तशी विनंती या कंपन्यांनी ट्रायकडे केलेली आहे. या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे भविष्यही पणाला लागेल याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले. बीएसएनएल एमटीएनएल कंपन्या गेली ५० वर्षे सामान्य जनतेच्या सेवेत आहेत. मोफत काॅल्स संभाषण द्यायचे होते तर या कंपन्यांना आधी संधी दिली पाहिजे होती. पण तसे काही ट्रायने केलेले नाही. यामुळे संशय निर्माण झाला आहे, असा अाराेप सावंत यांनी केला.

कोण कुणाच्या मुठीत
मार्केटिंगसाठी रिलायन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरत असेल तर ‘कोण कुणाच्या मुठीत आहे’ हे समजते, असा टाेलाही सावंत यांनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...