आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना चित्रपट सेनेचा स्टार वाहिनीला दणका; कलाकारांना मिळवून दिले मानधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘गौरी भोसले हरवली आहे’ अशी जाहिरात करून स्टार प्लस वाहिनीवर सुरू झालेली ‘खामोशिया’ ही मालिका केवळ चार महिन्यांत बंद पडली. यात काम करणा-या मराठी कलाकारांचे 85 लाखांचे मानधन थकवणारा निर्माता माणिक बेदी याला शिवसेनेच्या चित्रपट शाखेने दणका दिल्यानंतर त्याने मानधनाचे धनादेश कलाकारांना सुपूर्द केले.
नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेली ही मालिका चार महिन्यातच बंद पडली. निर्मात्यांना तोटा सहन करावा लागल्याने मालिका दीर्घ काळ सुरू ठेवता आली नाही. यात मृणाल कुलकर्णी, रवींद्र मंकणी, सुचित्रा बांदेकर, तुषार दळवी, शिल्पा तुळसकर असे मराठी कलाकार होते.


रोहिणी निनावे यांचे लेखन व हेमंत देवधर यांचे दिग्दर्शन होते. मात्र, मालिका बंद झाल्यानंतर कलाकारांना त्यांचे शिल्लक मानधन मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या चित्रपट शाखेने निर्मात्यांना हिसका दाखवला. त्यानंतर त्यांनी चित्रपट शाखेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते धनादेश कलाकारांना दिले.