आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमधील शिवाजी पार्कावरच होणार आहे. शिवसेनेची गेली 47 वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.
याचाच संदर्भ घेत यंदाही सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी सेनेच्यावतीने मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. अखेर यावर आज सुनावनी झाली व हायकोर्टाने त्यांना सशर्त परवानगी दिली. त्यामुळे सेनेचा ऐतिहासिक असा 48 दसरा मेळावा आता दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानावरच होणार हे नक्की झाले आहे. दरम्यान, परवानगी मिळण्याआधी सेनेने तेथे तयारी सुरू केली होती. तसेच सेनेच्या स्थानिक नेत्यांनी तशी पोस्टर लावली होती.