आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवन्याची मिरची राजधानीत, दररोज १०० पोत्यांची आवक, इतर राज्यांतही भाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - मुंबई, वाशीसह परराज्यातील गुजरात, मध्य प्रदेश येथील मोठ्या बाजारपेठेत शिवना ब्रँड म्हणून ओळखली जाणारी तेजा, तेजस्विनी हिरवी मिरची बाजारपेठेत दाखल झाली आहे. गेल्या वर्षी जमिनीची धूप न झाल्याने पांढरी माशी व थ्रिप्स रोगाने मिरचीचे मोठे नुकसान झाले. यंदा मात्र, मिरचीसाठी पोषक वातावरण असल्याने चांगले उत्पादन झाले आहे.

उन्हाळी मिरची लागवडीतून उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्याने आता येथील व्यापारी मिरची खरेदी करण्यास सज्ज झाले आहेत. सुरुवातीलाच पस्तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो भाव मिरचीला मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि वरंगळ भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मिरचीची लागवड केली जाते. जूनच्या शेवटचा आठवडा किंवा जुलै महिन्यात या मिरचीचे उत्पादन निघण्यास सुरुवात होते. सिल्लोड तालुक्यातील या मिरचीला मुंबई, वाशी, नागपूर, मध्य प्रदेश, गुजरात येथील बाजारात मोठी मागणी असते. शिवन्यासह तालुक्यात जळकीबाजार, खुपटा, धोत्रा, गोळेगाव, अन्वी, घाटनांद्रा, उंडणगाव, अंधारी येथील शेतकरी उन्हाळी मिरचीची लागवड करतात. खरिपाच्या हंगामात मिरचीच्या उत्पादनातूनच बहुतेक शेतकरी आर्थिक गणित जुळवतात. येथील व्यापारी नगदी पैसे देऊन शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी करतात.

मल्चिंग पेपरचा वापर
परिसरात साधारणत: मार्च किंवा एप्रिलदरम्यान ठिबकवर मिरचीची लागवड होत असते. मात्र, गेली दोन वर्षे सततचा दुष्काळ व गारपिटीमुळे झालेला रोगांचा प्रादुर्भाव यामुळे परिसरात यंदा उशिराने मिरची लागवड झाली. शिवाय पाण्याची बचत व रोग प्रतिबंधक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.

१०० पोत्यांची आवक
पन्नास ते शंभर पोत्यांची आवक शिवना बाजारपेठेत सध्या हिरवी मिरचीची शंभर ते दीडशे पोत्यांची आवक सुरू झाली आहे.

मिरचीला पोषक वातावरण
अजिंठा डोंगररांगामुळे मिरची उत्पादनाला येथे पोषक वातावरण तयार होते. गेल्या वर्षी जमिनीची धूप न झाल्याने पांढरी माशी व थ्रिप्स रोगाने मिरचीचे मोठे नुकसान झाले. या वेळी मात्र परिस्थिती बदलून मिरचीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, तरी शेतकऱ्यांनी शेतीतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी