आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात येईल तो ‘आमचा माणूस’,मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचा राज यांना टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला.

मध्य प्रदेश हे राज्य सगळ्यांसाठी खुले आहे. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असे पाहून आम्ही वागणूक देत नाही. आमचे राज्य देशाच्या हृदयासारखे असून तेथे येणारा प्रत्येक जण ‘आमचा माणूस असतो’ असे मराठीत ते म्हणाले. बॉम्बे रुग्णालयामध्ये डॉ. रामेश्वर बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी चौहान मुंबईमध्ये आले होते.

सिंह यांनी राज यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या मराठी-अमराठी राजकारणावर त्यांनी ही टोलेबाजी केल्याने राजकीय वतरुळात लगेच चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे राज यांच्याशी जवळीक साधण्यासाठी भाजप नेते नितीन गडकरींपासून राज्यातील बहुतेक नेते उत्सुक आहेत.

राज यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीही आपले चांगले संबंध ठेवले आहेत. अशा वेळी चौहान यांच्या वक्तव्यामुळे भाजप-राज ठाकरे मैत्रीवर काही परिणाम होणार का, याबद्दल उत्सुकता आहे.