आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नांदेडचा शिवराज थडगे प्रथम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षा 2012चा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात नांदेडचा शिवराज बाबूराव थडगे राज्यात प्रथम, कोल्हापूरचा विकास विलास सुरवसे द्वितीय, तर बीडचा अमोल ज्ञानदेव ढाकणे तिसरा आला. शिरूर (पुणे) येथील कविता दशरथ टोणगे मुलींमध्ये प्रथम आली आहे.

पूर्वपरीक्षा दिलेल्या 1,19,561 उमेदवारांमधून 600 पदांसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली. यात 167 महिलांची, तर अनु. जाती 92, अनु. जमातीतील 46 उमेदवारांची शिफारस आहे. पुणे विभागातून 257, औरंगाबाद 103, नाशिक 133, मुंबई 38, अमरावती 47 उमेदवारांची निवड झाली. नगर, औरंगाबाद, नाशिक व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लावल्या आहेत.

यंदा 714 पदांसाठी उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेची 16 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार असल्याचे आयोगाने कळवले आहे.