(छायाचित्र- शिवसैनिकांकडून अरविंद भोसलेंना भेट मिळालेल्या सोन्याच्या चपलाचा जोड असा आहे)
मुंबई- बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक किती कट्टर असतो, किती मनापासून काम करतो याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास
आपल्याला अरविंद भोसलेंकडे पाहता येईल. मुंबईतील वरळी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख असलेल्या अरविंद भोसले यांनी गेल्या तब्बल नऊ वर्षापासून आजतागायत पायात चप्पल घातली नाहीये. मात्र, आजपासून ते पुन्हा चप्पल घालणार आहेत तेही पायात सोन्याची चप्पल पायात घालून. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते अरविंद भोसले यांना आज सोन्याची चप्पला भेट दिल्या जाणार आहेत. तळकोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील जागृत श्री देव वेतोबाच्या मंदिरात हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
पुढे वाचा सविस्तर अरविंद भोसले का चालले 9 वर्षे अनवाणी आणि आता का मिळताहेत सोन्याची चप्पलाची भेट...
नारायण राणे शिवसेनेतील एकेकाळचे मोठे प्रस्थ. बाळासाहेबांनी या सामान्य कार्यकर्त्याला थेट मुख्यमंत्रीपदी बसवले. मात्र त्याच नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती खासकरून कोकणातील. त्यापैकी अरविंद भोसले हे एक. राणेंसारख्या सामान्य सैनिकाला बाळासाहेबांनी राज्याचे सर्वोच्चपद दिले ते केवळ सत्तेसाठी व फायद्यासाठी नव्हे तर सच्चा शिवसैनिक म्हणून. पण तोच जर आता गद्दारी करून सत्तेसाठी शिवसेना सोडत असेल त्याचा धिक्कार व निषेध केलाच पाहिजे असे सांगत अरविंद भोसले यांना वाटू लागले. त्याचाच भाग म्हणून भोसलेंनी नारायण राणेंचा सिंधूदुर्गात जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, मी अनवाणीच राहीन, अशी प्रतिज्ञा 21 नोव्हेंबर 2005 रोजी केली, तीही आपल्या कोकणातील मूळ गावाकडील जागृत श्री वेतोबा देवाच्या मंदिरात. श्री वेतोबाच्या वर्षातून दोनदा कार्तिक शुध्द 15 ( म्हणजे आजच्या दिवशी) व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होते. श्री वेतोबास सालई झाडाच्या पानाचे 33 प्रसाद लावण्याची वहिवाट आहे. त्यानुसारच आजचा कार्यक्रम नियोजित केला आहे. आज 9 वर्षांनंतर योगायोगाने 22 नोव्हेंबरलाच ते नवस पूर्ण करीत आहे. यावेळी उद्धव ठाकरे भोसलेंना चपला भेट देतील.
पुढे वाचा, काय आहे कोकणातील वेतोबा देवाची ख्याती....