आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमुक्तीसाठी शिवसेना रस्त्यावर, दस-यापूर्वी रक्कम खात्यावर जमा करा अन्यथा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतक-यांना येत्या विजयादशमीपूर्वी (दस-याआधी) कर्जमाफी दिली पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेनेने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. सरकारने दस-याआधी शेतक-यांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. कोल्हापूर, नाशिक, नगर, यवतमाळ, औरंगाबादसह राज्यातील ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले.
 
शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, काँग्रेसच्या काळात एकदा घोषणा झाली की, शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी मिळायची, मात्र राज्यातील फडणवीस सरकारला जास्त अक्कल असल्याने कर्जमुक्ती मिळत नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले की, रब्बी हंगामासाठी शेतक-यांना बॅंकांनी कर्जे उपलब्ध करून दिली पाहिजेत. सरकारने याकडे लक्ष देऊन शेतक-यांचा त्रास कमी करावा. रावते यांनी पक्षाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नव्याने भेट घेऊन त्यांना कळविली आहे.
बातम्या आणखी आहेत...