मुंबई- शिवसेना आता पन्नाशीत पोहचली आहे. आजपर्यंत शिवसेना महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी व भूमीपुत्रासाठी लढली. मात्र आता ती राज्यापुरती मर्यादित ठेवणार नाही. महाराष्ट्रासारखीच इतर राज्यांतील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढेल. शिवसेना यापुढे देशपातळीवर काम करेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वाच्या मुद्यावर सेना देशभर पसरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या स्थापनेला येत्या रविवारी (19 जून) 50 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने एका वृत्तवाहिनीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव यांनी शिवसेनेच्या स्थापना दिवसापासून आतापर्यंतच्या वाटचालीवर भाष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी मी केवळ 6 वर्षाचा होतो. त्यादिवशी सकाळी बाळासाहेबांचे एक सहकारी आले. त्यानंतर प्रबोधनकार, बाळासाहेब व त्यांच्या पाच-सहा सहका-यांनी नारळ वाढवला. पुढे शिवसेना जशी जशी वाढत गेली फुलत गेली तसे तसे त्याबाबत घरात बोलले जायचे. यातून समाजकारण, राजकारण कळायला लागले. शिवसेनेने स्थापनेपासून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे सूत्र अवलंबले. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. मात्र, 90 च्या दशकानंतर शिवसेना पूर्ण ताकदीने राजकारणात उतरली. यात कधी यश मिळाले तर कधी नाही पण शिवसेना नावाचे वलय कायम राहिले व नव्हे वाढत गेले. गेल्या 50 वर्षांत अनेक पक्ष आले आणि गेले पण शिवसेना कायम आहे. कारण शिवसेना हा एक विचार आहे आणि विचारांचा अस्त कधीच होत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केवळ निवडणूक लढवणारीच नाही तर जिंकणारी पहिली संघटना म्हणजे एकमेव शिवसेनाच आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने भाजपवर टीका का करते या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव म्हणाले, शिवसेनेचा जन्म समाजकारणासाठी झालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही 25 वर्षापूर्वी भाजपसोबत युती केली. समाजाला काय हवे आहे हे समजून आम्ही एकत्र आलो. आता युती तुटली आहे. भाजप सत्तेत आहे. आम्हीही सत्तेत आहोत पण जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना लढली व यापुढेही लढेल. जिथे जनतेवर अन्याय होईल तेथे शिवसेना आवाज उठवणारच ही आमची स्पष्ट भूमिका आहे. भूसंपादनाचा विषय असो की शेतक-यांच्या आत्महत्या किंवा रेल्वेची दरवाढ असो याविषयावरर आम्ही जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचला होता. त्यामुळे ती तुम्हाला टीका वाटत असेल. शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे व भाजपचे कौतूक करायला माझा पक्ष भाजपमध्ये विलीन केलेला नाही असेही उद्धव यांनी ठणकावले.
पुढे वाचा, मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे...
तसेच विविध मुद्यांवर काय भाष्य केले उद्धव यांनी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)