आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीके चित्रपटात पाकिस्तानी गुप्तचर संघटना \'ISI\' ने लावला पैसा?- शिवसेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आमिर खानच्या 'पीके' चित्रपटावरून वाद थांबण्याचे नाव घेत नाही. हिंदुत्त्ववादी संघटनांनी व भाजपने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर आता शिवसेनेने यात उडी घेतली आहे. शिवसेनेने पीके चित्रपटाची लिंक आता पाकिस्तानी गुप्तचर संघटना 'आयएसआय'शी जोडली आहे. सामनात लिहलेल्या एका लेखात शिवसेनेने आरोप केला आहे की, पीके चित्रपटात आयएसआयने पैसा लावला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान एका पाकिस्तानी मीडिया कंपनीचा फलक लावल्याचे सांगत शिवसेनेने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
स्वामींच्या आरोपाचे केले समर्थन- सामनात लिहलेल्या लेखात म्हटले आहे की, पीके चित्रपट आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय'ची लिंक स्पष्टपणे समोर आली आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आरोप केला होता की, 'पीके' चित्रपटात आयएसआयचा पैसा आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
पाकिस्तानी मीडिया ग्रुपचा पीकेशी आहे संबंध- शिवसेनेने पाकिस्तानी मीडिया ग्रुप एआरवाय डिजिटल या कंपनीचा फलक पीकेच्या पत्रकार परिषदेत लावल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सेनेचे म्हणणे आहे की, एआरवाय आणि 'पीके'चे निर्माता-दिग्दर्शक आणिर आमिर खान यांचा काय संबंध आहे? खरंच एआरवायने तर या चित्रपटात पैसा टाकला नाही? एआरवाय एक पाकिस्तानी कंपनी जी पाकिस्तानपासून दुबईपर्यंत टीव्ही चॅनेल ते अनेक प्रकारच्या व्यवसायाशी संबंधित आहे. ही पत्रकार परिषद डिसेंबर 2014 मध्ये दुबईत झाली होती.

एआरवायच्या मालकाचा आयएसआयशी संबंध- शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, एआरवाय डिजिटल ग्रुपच्या मालकाचा संबंध तालिबानशी आहे. एआरवाय ग्रुपचे मालक अब्दुल रज्जाक याकूबचे संबंध तालिबानसह पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी राहिले आहेत. याचबरोबर कुख्यात ड्रग्स तस्कर इकबाल मिर्चीचाही तो जवळचा सहकारी राहिला आहे. भारताच्या गुप्तचर संघटनेसह इंग्लंड सरकारच्या निशाण्यावर याकूब होता. सात वर्षापूर्वी लंडनमध्ये याकूबचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानातील पैसा बॉलिवूडमध्ये लावल्याचा आरोप- पीके चित्रपटात एआरवाय ग्रुपचा पैसा असल्याचे सांगत शिवसेनेने म्हटले आहे की, यापूर्वीही काही चित्रपटात पाकिस्तानातील पैसा गुंतवला गेला होता. आता हे उघड आहे की एआरवायचा मालक याकूब चॅनेल खोलून व्यवसाय करू इच्छित होता. यावरून अशी शक्यता आहे की, कोणत्या तरी तिस-या मध्यस्थामार्फत हे पैसे बॉ़लिवूडमध्ये गुंतवले असावेत. कारण ज्या प्रकारे दुबईतील पत्रकार परिषदेत एआरवायचा फलक लावला गेला तो पाहता संबंधित कंपनी प्रायोजक आणि अर्थ पुरवठादार आहे हे दिसून येते असे सेनेने म्हटले आहे.
पुढे पाहा, दुबईत झालेल्या पत्रकार परिषदेतील काही छायाचित्रे...