आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्ववादी, राष्ट्रभक्तांची आता वाचा गेली काय?- उद्धवची भाजप-संघपरिवारावर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हुर्रियत आता कश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानशी चर्चा करणार आहे व तशी विशेष सवलत केंद्र सरकारने हुर्रियत मंडळींना दिली आहे. हुर्रियतप्रकरणी केंद्र सरकारची भूमिका म्हणजे अयोध्येतील राममंदिर ही बाबरीच होती अशी पलटी मारण्यासारखाच प्रकार आहे. सरडाही लाजेल असे रंग बदलले जातात तेव्हा हे यांना कसे जमते बुवा असा प्रश्‍न जनतेला पडतो. कश्मीरप्रश्‍नी विद्यमान सरकारने मारलेल्या पलटीने हिंदुत्ववादी व राष्ट्रभक्तांची वाचा गेली आहे व एरव्ही याबाबतीत रणशिंग फुंकणारे मूकबधिर झाले आहेत, अशा शब्दांत शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व संघपरिवारावर निशाणा साधला आहे.
हुर्रियत आता कश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानशी चर्चा करणार आहे व तशी विशेष सवलत केंद्र सरकारने हुर्रियत मंडळींना दिली आहे. या मुद्यांवरून शिवसेनेने मुखपत्र सामनात अग्रलेख लिहून भाजप व संघपरिवारातील राष्ट्रभक्तांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, सरडा किती वेळा आणि कसा रंग बदलतो याचा अभ्यास राजकारणी मंडळींनी आता करायलाच हवा. हुर्रियत आणि कश्मीरप्रश्‍नी जी पलटी केंद्र सरकारने मारली तशी पलटी काँग्रेस राज्यकर्त्यांनी मारली असती तर भारतीय जनता पक्ष व संघपरिवाराने काँग्रेसला पाकिस्तानचे एजंट ठरवले असते. काँग्रेसचे राज्यकर्ते कश्मीर पाकिस्तानला विकायला निघाले आहेत व असे देशद्रोही लोक सत्तेवरून हाकलून दिले पाहिजेत असे त्यांनी सांगितले असते. कदाचित या मुद्द्यावर संसदेचे कामकाज बेमुदत बंद पाडले असते व हे सर्व राष्ट्रहित व राष्ट्रीय सुरक्षेसाठी करीत असल्याचा मुलामा दिला असता, पण पाकनिष्ठ व हिंदुस्थानद्रोही ठरवलेल्या हुर्रियत मंडळींना मांडीवर घेऊन त्यांचे लाडकोड सध्याच्या दिल्लीश्‍वरांनी चालवले आहेत. हुर्रियत ही सरळसरळ फुटीरतावादी संघटना आहे. कश्मीर सोडून इतर सर्व विषयांवर पाकिस्तानशी चर्चा करू असे मोदी सरकारचे म्हणणे कालपर्यंत होते. आता त्या भूमिकेत बदल झाला आहे व काँग्रेसनेही कश्मीरप्रश्‍नी घेतली नव्हती अशी बुळचट भूमिका विद्यमान सरकारने घेतली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली आहे.
पुढे वाचा, भाजप-हुर्रियत यांच्यातील गुप्त कराराचा खुलासा करा- उद्धव ठाकरे...
बातम्या आणखी आहेत...