आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिशंकरांसह शिवसेनेचे भाजपला फटकारे, \'सामना\'तून मुस्लिम लांगूलचालानावर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे काँग्रेस भाजपवर टीकास्त्र सोडत आहे तर, दुसरीकडे त्यांचाच मित्र पक्ष शिवसेनेने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता एकगठ्ठा मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून राजकीय पक्षांच्या मुसलमानांच्या लांगूलचालनावर टीका करण्यात आली आहे. 'मणिशंकरांची बांग! लांगूलचालनाचे हिरवे जहर' या शिर्षकाखाली, काँग्रेससह सर्वच पक्ष मुस्लिमांच्या एकगठठा मतांसाठी निधर्मी देशात, मुसलमानांना वेगळा न्याय, वेगळा कायदा, त्यांना धार्मिक सवलती हे सर्व एका ‘निधर्मी’ देशात कसे चालू शकते, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अग्रलेखाचा रोख काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर असला तरी, शेवटी मुसलमानांचे लांगूलचालन हा आपल्या देशाला लागलेला शाप आहे व या शापाने देशाची गती कुंठीत झाली आहे. असे म्हणत, 'सत्ता मिळविण्यासाठी राममंदिर, समान नागरी कायद्यासारखे विषयही बाजूला ठेवले जातात व जाहीर सभांतून बुरखेवाल्या महिलांची उपस्थिती दिसावी यासाठी खास प्रयत्न केले जातात. असा भाजपचे नाव न घेता आरोप केला आहे.

कोणाचेही नाव न घेता पुढे लिहिले आहे, 'सगळ्यांनाच निधर्मी होण्याची घाई झाली आहे व मुसलमानांचे तारणहार म्हणून डंका पिटायचा आहे. कॉंग्रेसने केलेले हे पाप नष्ट करायचे सोडून जो तो कमरेवरचे सोडून मुसलमानी लांगूलचालनाच्या स्पर्धेत उतरू लागला आहे.'