आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Attack On Bjp About Modi Wave In Saamana

मोदी लाटेवर विधानसभा जिंकू या हवेत कोणी राहू नये- शिवसेनेचा भाजपला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- उद्धव ठाकरे)
मुंबई- लोकसभेत मोठा विजय मिळवला म्हणून त्याच्या हवेवर विधानसभा जिंकू या हवेत कोणी राहू नये. प्रत्येक निवडणूक हवा व गणिते वेगळी असतात मग ती लोकसभेची असो की विधानसभेची हे कालच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील निकालाने ते पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने यातून बोध घ्यावा व निकालाचा अभ्यास करावा, अन्यथा गणित बिघडल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. लोकसभेतील यश पाहता आम्हाला जागा वाढवून दिल्या पाहिजेत असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेना त्यासाठी तयार नाहीय लोकसभेसाठी भाजप मोठा भाऊ तर विधानसभेसाठी शिवसेना मोठा भाऊ हे सूत्र स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी घालून दिले होते. त्यानुसार जागावाटप व्हावे असे सेनेचे म्हणणे आहे. मात्र लोकसभेत जबरदस्त असा विजय मिळाल्यानंतर भाजप सातवे अस्मानवर आहे. मोदींची देशात हवा आहे, ती महाराष्ट्रातही राहील असे सांगत भाजपने सत्तेच्या स्वप्नाचे इमले बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या काही राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल संमिश्र लागले. यावरून शिवसेनेने भाजपचा चोपण्याची संधी गमावली नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज अग्रलेख लिहून सेनेने भाजपला इशारा वजा सल्ला दिला आहे. मात्र, तो सल्ला भाजपला अधिक झोंबण्याचीच शक्यता आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्राचा कारभार चोख करण्यासाठी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली होती. त्यानंतर आता काही राज्यांत विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. त्याचे निकाल संमिश्र लागले आहेत. या सर्व निकालांचा अर्थ इतकाच की, उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपसह महायुतीस कंबर कसून कामास लागावे लागेल. लोकांना महाराष्ट्रात सत्ताबदल करायचा आहे, पण नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येणार नाहीत. राज्याची हवा व गणिते वेगळी असतात, ती बिघडू नयेत यासाठी बिहार, कर्नाटकातील निकालांचा अभ्यास करावाच लागेल. मध्य प्रदेशात तीन जागांपैकी एका जागेवर कॉंग्रेसने विजय मिळवला. पंजाबातही दोनपैकी एक जागा कॉंग्रेसने जिंकली. कर्नाटकात तीनपैकी दोन जागा कॉंग्रेसने जिंकल्या.
लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नावाची जबरदस्त लाट होतीच व त्या लाटेमुळे उत्तरेत, बिहारात मोदीविरोधक भुईसपाट झाले. मात्र आता पोटनिवडणुकीतील निकाल पाहता काही गांडुळांना थोडे जीवनदान मिळालेले दिसते. बिहारातील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्षच लागले होते ते खरे आहे. विधानसभेच्या 10 जागांसाठी तेथे पोटनिवडणूक झाली. लालू यादव व नितीश कुमारांच्या युतीने सहा जागांवर विजय मिळवला असून चार जागा भाजपच्या पारड्यात गेल्या आहेत. बिहारात कॉंग्रेसलाही एक जागा मिळाली आहे, असे सांगत भाजपला इशारा दिला आहे.
शिवसेनेने भाजपला सल्ला देत काय काय इशारे दिले आहेत, वाचा पुढे...