आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाम अलींचे स्वागत अन् शाहरूखला चले जाव हा दुतोंडी प्रकार- सेनेची भाजपवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सहिष्णुता व असहिष्णुतेच्या प्रकरणी शाहरुख खानला ‘मुसलमान’ म्हणून फटकारणे योग्य नाही. एकीकडे पाकिस्तानी कलाकार गुलाम अलींच्या ‘गायकी’स दाद देत मुंड्या डोलवायच्या तर दुसरीकडे भारतीय कलावंत शाहरूख खानला पाकिस्तानात चालता हो म्हणायचे हे काही देशाभिमान व राष्ट्रहिताचे लक्षण नाही. भाजपचा सध्या ‘दुतोंडी’ प्रकार सुरू आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त गुलाम अली ते शाहरूख या मथळ्याखाली लिहलेल्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. यात म्हटले आहे की, शाहरुख खान हा एक कलावंत आहे व तो अधूनमधून वादाच्या भोव-यात गटांगळ्या खात असतो. त्याच्या अतिरेकी आगाऊपणाची सालपटे अनेकदा शिवसैनिकांनी काढली, पण फक्त मुसलमान म्हणून त्याला ‘टार्गेट’ करणे व चालते व्हा सांगणे हे योग्य नाही. निदान या प्रकारात तरी योग्य नाही व त्याच वेळी कसुरी, गुलाम अलीस पायघड्या घालून संरक्षण द्यायचे हा प्रकार गोंधळात टाकणारा आहे. तिकडे हाफीज सईद जे बरळतो आहे व हिंदुस्थानातील मुसलमानी समाजाची माथी भडकवून आपल्यात फाटाफूट निर्माण करीत आहे. यावर कठोर पावले उचलायची गरज असताना राजकारण्यांनी सहिष्णुता व असहिष्णुतेच्या प्रकरणी शाहरुख खानला ‘मुसलमान’ म्हणून फटकारणे योग्य नाही. गुलाम अली व कसुरी प्रकरणात राज्याची व देशाची बदनामी झाली असे ज्यांना वाटले त्या सगळ्यांचे मुखवटे ‘शाहरुख’प्रकरणी गळून पडले, असे सांगत भाजप कसा दुतोंडी आहे हे सांगितले आहे.
गुलाम अलींच्या भूमिकेचे शिवसेनेकडून स्वागत
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी मी यापुढे भारतात कार्यक्रम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाच्या मुद्द्यांचे निराकरण होत नाही व जोपर्यंत दोन्ही देशांतील तणाव निवळत नाही तोपर्यंत भारतात येणार नसल्याचे गुलाम अली यांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल शिवसेनेने त्यांचे अभिनंदन केले आहे.
पुढे वाचा, शिवसेनेने कोणत्या शब्दांत गुलाम अलींच्या भूमिकेचे स्वागत केले...