आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचे सोमय्यांना प्रश्न, काँग्रेस कार्यकर्त्‍याची शिवसेना भवनमध्‍ये पत्रकार परिषद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘काँग्रेस आणि शिवसेनेची युती’ झाल्याच्या भाजपच्या अाराेपाचे खंडन दाेन्ही पक्षांकडून केले जातेे. मात्र, भाजपच्या किरीट सोमय्यांवर प्रतिहल्ला करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस कार्यकर्त्याचीच मदत घेतली आहे. काँग्रेस कार्यकर्ते शेखर वैष्णव यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर आरोप करीत १८ प्रश्नांची उत्तरे मागितली. परंतु एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण सांगितले नाही. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही या वेळी भाजपच्या जाहीरनाम्याचा पंचनामा करणारी पुस्तिका दाखवत अामच्या मुद्द्यांचाच भाजपने जाहीरनामा केल्याचे सांगितले.  
 
उद्धव ठाकरे यांची संपत्ती जाहीर करावी असे अाव्हान साेमय्यांनी दिले हाेते. यानंतर शिवसेनेने सोमय्या यांचे एकेकाळचे सहकारी वैष्णव यांची मदत घेतली. वैष्णव म्हणाले, मी पूर्वी भाजपमध्ये होतो. २००५ पासून काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार आहे.  सोमय्या यांनी मोठे घोटाळे केले आहेत. काँग्रेसने मला सोमय्या यांच्याविरोधात बोलायला प्लॅटफॉर्म दिला नाही. त्यामुळे मी शिवसेनेच्या व्यासपीठावरून आरोप करतोय. मी सोमय्यांना १८ प्रश्न विचारतो. त्याचे त्यांनी उत्तर द्यावे व माझ्याशी समोरासमोर चर्चा करावी,’ असे अाव्हानही त्यांनी साेमय्यांना दिले.  

अमित शहांची संपत्ती जाहीर करा:  हिंमत असेल भाजप सरकारने  उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चाैकशी करावी. तसेच अमित शहा यांची संपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना खासदार शेवाळे यांनी केली.
 
बाळासाहेबांनी दम दिलेला वैष्णव शिवसेनेच्या व्यासपीठावर   
व्यवसायाने सीए असलेल्या शेखर वैष्णव यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी दम दिला होता. तोच शेखर वैष्णव आज शिवसेनेच्या व्यासपीठावर आल्याने शिवसेना बदलली का? असा प्रश्न विचारला जात आहे. सत्यम घोटाळा झाला तेव्हा वैष्णव यांनी मुंबईत बाळासाहेबांचे फोटो असलेले पोस्टर्स लावून बाळासाहेब गप्प का?,  असा प्रश्न विचारला होता. तेव्हा सामनामधून बाळासाहेबांनी “कोण हा शेखर वैष्णव म्हणत पोस्टर्स काढून टाक, नाहीतर शिवसैनिक उत्तर देतील’ अशी धमकी वैष्णव यांना दिली होती, अशी आठवण एका शिवसेना नेत्याने सांगितली. 
बातम्या आणखी आहेत...