आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजसह मनसेच्या पदाधिकार्‍यांना नोटीस, कायद्यासमोर सगळे समान - गृहमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोलविरोधात बुधवारी राज्यभरात रास्तारोको आंदोलन करणार आहे. या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनसेच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांना जमावबंदीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसांची खिल्ली उडवत मनसेचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, 'राज्यातील पोलिस प्रशासनाने नोटीसा बजावण्याचा विक्रम केला आहे. आमचा टोलला विरोध आहे आणि तो बुधवारी व्यक्त होणार आहे. पोलिसांनी त्यांचे काम करावे आम्ही आमचे काम करु.' शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेवर ते म्हणाले, 'आमचे आंदोलन काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारविरोधात आहे. त्यामुळे आता आमच्यावर टीका करणारे नेमके कोणत्या बाजूने आहेत ते जनतेनेच ठरवावे.'
मनसेच्या राज्यातील महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत. फौजदारी दंड संहितेतली कलम 149 नुसार या नोटासा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर दरेकर म्हणाले, 'आम्ही देशावर आक्रमण करणार असल्यासारख्या नोटीसा पोलिस प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत. मात्र, आम्ही आंदोलन करणारच आहोत.'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलिस स्टेशनचे पोलिस निरीभक परशुराम काकड यांनी राज यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे जावून त्यांना नोटीस दिली आहे. मनसेचे आंदोलन एकच दिवसाचे असले तरी पोलिसांनी 21 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. यामुळे रास्तारोको, मोर्चा, निदर्शने करण्यास नोटीसमध्ये मनाई करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडध्ये, कायद्यासमोर सगळे समान, भल्याभल्यांवर कारवाई : पाटील