आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Attack\'s BJP, Prabhu In Saamana Editorial

.. हे असेच सुरू राहणार असेल तर अच्छे दिन कोणाला आले ? सेनेचा भाजप, प्रभुंना सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शुक्रवारी संतप्त रेल्वे प्रवाशांनी घातलेल्या गोंधळानंतर मुंब्रा पोलिसांनी 17 हजार आणि रेल्वे पोलिसांनी 12 हजार प्रवाशांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कारवाईही सुरू केली आहे. त्याचाच धागा शिवसेनेने केंद्र आणि राज्य सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडत भाजपवासी झालेले सुरेश प्रभू यांच्यावर हल्ला चढवला असल्याचे या अग्रलेखातून समोर येत आहे.

काँग्रेस सत्तेत असताना जेव्हा अशा प्रकारे लोकांचा संताप उडायचा त्यावेळी हा लोकांच्या भावनेचा उद्रेक असल्याचे म्हटले जात होते. मग आता शुक्रवारी जो प्रकार झाला, ती कायदा व सुव्यवस्थेची होळी कशी ठरू शकते असा सवाल या माध्यमातून सरकारला करण्यात आला आहे. त्यात पोलिसांनी आता कारवाई सुरू केली असल्याने रेल्वे प्रवाशांचे धाबे दणाणले असल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे.
सरकारच्या कारवाईवर टीका करताना अग्रलेखात असे म्हटले आहे की, या दंगलप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी १७ हजार, तर रेल्वे पोलिसांनी १२ हजार दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. डोंबिवली, अंबरनाथ, दिवा, मुंब्रा, कळवा अशा ठिकाणांहून आतापर्यंत २५ लोकांना अटक केली. आता मुंब्रा पोलिसांनी १७ हजारांचा व रेल्वे पोलिसांनी १२ हजारांचा ‘ठोस’ आकडा कुठून काढला? ही डोकी मोजली कोणी? मध्य रेल्वेच्या गोंधळाविरोधात आंदोलन झाले व त्यास हिंसक वळण लागले हे खरे. पण प्रवासी हिंसक होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत झाली यावर कारवाईखोर पोलीस व अधिकारी बोलत नाहीत.
अच्छे दिन नेमके कोणाला?
काँग्रेस राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले हा प्रश्‍नच आहे. दुसर्‍यांचे सरकार असते तेव्हा लोकांनी कायदा हातात घ्यावा असे ज्यांना वाटत होते त्यांचे सरकार देशात व राज्यात अवतरले आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार काय करणार आहे तेवढे सांगा म्हणजे झाले. अशा शब्दांत सरकारचा समाचार यामाध्यमातून शिवसेनेने घेतला आहे.
पुढे वाचा, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर केलेली टीका...