आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या वाढदिवशी शिवसेनेची यादी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवशी म्हणजे 23 जानेवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ बाळासाहेबांच्या उपस्थितीत ‘बीकेसी’ येथून होणार असून समारोपाची जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे.
16 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान होत असून, 24 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जागा वाटपात शिवसेनेने स्वत:च्या वाट्याला जास्तीत जास्त आणि यश मिळतील अशा जागा घेतल्या आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ऐनवेळीच यादी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 23 जानेवारी रोजी सकाळी उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रचाराचा शुभारंभ बीकेसी येथे आयोजित सभेने केला जाणार आहे. या सभेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मार्गदर्शन करतील. तसेच ठाणे येथे महायुतीच्या संयुक्त प्रचार सभेचेही आयोजन केले जाणार आहे. प्रचाराचा समारोप शिवाजी पार्क येथे एका भव्य सभेचे आयोजन करून केला जाणार आहे. भाजप आणि रिपाइंच्या उमेदवारांची यादीही 23 जानेवारी रोजीच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.