आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शिव\'सैनिक धाग्याच्या बंधनात: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची घेतली शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेच्या वतीने आज ‘प्रतिज्ञा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्यभरातील लाखो शिवसैनिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहून 'शिव'बंधन बांधत बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची शपथ घेतली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून ‘प्रतिज्ञा’ सांगितल्यानंतर शिवसैनिकांनी एकमेकांच्या मनगटावर 'शिव'बंधन बांधले. शिवबंधन बांधण्यासाठी सैनिक एकमेंकाना मदत करीत होते. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी काही नेत्यांना व वरिष्ठ शिवसैनिकांना 'शिव'बंधन बांधून या औपचारिक कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते श्रीमान बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमीचे नामकरण व प्रकाशन करण्यात आले. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. शिवसेना मोबाईल डिक्शनरी, शिवसेना, बाळासाहेबांच्या गाजलेल्या भाषणाच्या क्लिपचे अॅप, महिला तरूणींच्या सुरक्षेसाठी अॅप, बाळासाहेबांची पत्रकारिता आणि साहित्य, एस फॉर यू आदी वेगवेगळ्या अॅपचे लोकार्पण करण्यात आले.
उद्धव ठाकरे म्हणाले,
- बाळासाहेबांच्या दर्शनाने वाघाचे बळ संचारते.
- शिवसैनिकांचे नवे वर्ष 23 जानेवारीपासून
- ही शक्ती शिवसेनाप्रमुखांची, शिवसैनिकांना लाचार होऊ देणार नाही
- शिवशक्तीचा वापर माझ्यासाठी करणार नाही, दुरुपयोग तर सोडाच..
- काँग्रेसच्या पंतप्रधानपदाचे येत्या 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर शेवटचे भाषण
- ही शिवशक्ती राहून अनेकांच्या पोटात गोळात आला असेल
- जमलेली गर्दी सच्चे शिवसैनिक, रेल्वेने गोळा केलेली नाहीत- मोदी व भाजपला टोला
- पंतप्रधान मनमोहनसिंग सर्वात दुबळे पंतप्रधान
- आदर्शमध्ये नेते सुटले, अधिकारी लटकले, चौकशी समिती ही तर केवळ नौंटकी
- राज्यात काँग्रेस-एनसीपी आता उरणार नाही
- पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आले अन् त्यांनी ऑपरेशन यशस्वी केले पण पेंशटला मारले
- लोकसभेसोबत विधानसभाच्या निवडणूका घ्या
- पुढचा पीएम एनडीएचाच असेल, आता तुम्हाला गाढणारच..
- तोडा-फोडा आणि राज्य करा- काँग्रेसची निती नाकारा
- मतांच्या लाचारीसाठी वेगवेगळ्या योजना व कायदे कशासाठी...
पुढे वाचा, सभेसाठी सुरक्षा व्यवस्था चोख व भाजप नेत्यांना निमंत्रण नाही, सेनेने भाजपचा पैरा फेडला...