आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा, उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार उद्धव, हिंदुत्वाच्या अाधारे यूपीत २०० जागी लढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचे वेध लागल्याने शिवसेना अाता अन्य राज्यातही निवडणूकल लढवत अाहे. गेल्यावेळी शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये काही उमेदवार उभे केले होते; परंतु म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. दिल्लीतही चाचपणी करून पाहिली होती. आता शिवसेना मोठ्या जोमाने इतर राज्यांत निवडणुकांना सामोर जाणार असून अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशात मोठ्या ताकदीने उमेदवार उतरणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराला जाणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनीच याबाबतचे सूतोवाच केले.
गोवा व उत्तर प्रदेश निवडणुकांची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. २००४ मध्येही शिवसेनेने उत्तर प्रदेश, दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे केलेे. मात्र एकाही मोठ्या नेत्याने प्रचारात सहभाग घेतला नव्हता. २००९ व २०१५ मध्येही पक्षाने ताकद आजमावली होती. गेल्या वर्षी शिवसेनेने बिहारमध्ये भूमिपुत्रांच्या हक्काची भूमिका घेत निवडणुकीत उडी घेतली. १५० उमेदवार उभे केले होते. मात्र, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यांमुळे शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळवून देण्याचा प्रयत्न राऊत करणार आहेत. तिथे शिवसेना २०० जागा लढवणार असून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा हाेतील. शिवसेनेचे अनेक नेते उत्तर प्रदेशमध्ये तळ ठोकून बसतील.

दसरा मेळाव्यानंतर राज्याबाहेर सभा
दसरा मेळाव्यानंतर उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक प्रचारासाठी अापण जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात ते वाराणसी आणि अयोध्येत प्रचारासोबतच गंगा पूजनही करणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाच्या कार्डासोबतच राम मंदिराचा मुद्दाही हाती घेण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...