आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेशी युतीचा निर्णय तीन महिन्यांपूर्वीचा; कार्यकर्त्यांची उणीव लक्षात घेऊन भाजपची ‘हुशारी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ग्रामीण पातळीवर कार्यकर्त्यांचा अभाव असल्याने नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वीच भाजपच्या काेअर कमिटीने घेतला हाेता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र या निर्णयाचे स्थानिक पातळीवर काय पडसाद उमटतात याची चाचपणी करण्यासाठी दादरच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत युतीचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्याचे सूताेवाच केले हाेते.

नगर पंचायत व परिषदांमध्ये भाजप चौथ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात हाेती. याच वेळी आक्रमक िवरोधकांची जागा शिवसेनेने घेतल्यामुळे भाजपची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे हा निर्णय भाजपला घ्यावा लागला, असे सांगितले जाते. लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत माेदी लाटेच्या जाेरावर भरभरून यश मिळविलेला अापला पक्ष नगर परिषद निवडणुकीत चाैथ्या क्रमांकावर फेकला गेल्यास अागामी मनपा निवडणुकीतही फटका बसू शकताे हे लक्षात घेऊन भाजपच्या ‘चाणक्यां’नी तीन महिन्यांपूर्वीच शिवसेनेशी हातमिळवणीचा निर्णय घेतला हाेता, असे कळते.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनंतर िजल्हा पातळीवरील संघटकांनी आपापल्या भागात पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेतला तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच स्थानिक आघाडीच्या तुलनेत आपण मागे पडत असल्याचे त्यांना िदसून आले. ही बाब त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कानावर घातली. त्यानंतर दानवे, मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्यात शिवसेनेशी युती करण्याबाबत एकमत झाले. त्यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनीही संमती दर्शवली. त्यामुळे गेली दाेन वर्षांपासून ताटातूट झालेले दाेन मित्रपक्ष पुन्हा एकत्र अाले अाहेत.

महापालिकेत सवता सुभा?
नगर परिषद, नगर पंचायती निवडणुकीनंतर पुढील वर्षी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे मनपाच्या निवडणुका हाेणार अाहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये भाजपची ताकद अधिक असल्याने येथे युती करायची नाही, असा िनर्णयही आधीच झालेला आहे. तसेच शिवसेनेवर भाजपतून कोणी टीका करायची अाणि कोणी सलोख्याचे संबंध ठेवायचे याचेही डावपेच ठरले असल्याचे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...