आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांपासूनची सेना-भाजप युती तुटणार? भाजप आत्मघातकी निर्णय घेण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या त्रयीमुळे 25 वर्षापूर्वी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांच्यात झालेली युती आज (शुक्रवार) संपुष्टात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या कोअर कमिटीची सकाळी 11 वाजता मुंबईत जागावाटपासंदर्भात अंतिम बैठक होणार आहे. त्यानंतर युती तोडल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. अमित शहा काल रात्री पुण्यात मुक्कामी होते. आज सकाळी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. अमित शहांनी यांनी भाजपमधील कोअर कमिटीतील सदस्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार स्वतंत्र लढविण्याचा निर्णय झाल्याचे कळते. मात्र, अधिकृत घोषणा होण्यास काही अवधी लागणार आहे. भाजपची कोअर कमिटी पक्षाध्यक्ष अमित शहांना तुटी तोडण्याबाबत प्रस्ताव देईल. त्यानंतर पक्षाध्यक्ष शहा हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डापुढे ठेवतील. त्यांची मंजूरी मिळाल्यानंतर याबाबतची घोषणा होणार असल्याचे कळते. त्यासाठी आज सायंकाळपर्यंत वेळ जाऊ शकते.
दरम्यान, शिवसेनेने आपल्या कोट्यातील 21 जागा भाजप व मित्रपक्षांना देऊ केल्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठीच अधिक जागा हवा आहेत. त्यामुळे भाजपने युती तोडल्यास त्याचा त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युती तुटल्यास भाजपचा इतिहास पाहता मराठी जनता मोदी-शहा या जोडीऐवजी बाळासाहेब ठाकरेंच्या वलयामुळे सेनेला व ग्रामीण भागातील पारंपारिक मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीला पसंती देऊ शकतात असेही तज्ज्ञांनी मत मांडले आहे.
भाजपने 135 जागा हव्याच, असा अट्टाहास ठेवल्याने जागावाटपाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. शिवसेनेने आपल्या 171 जागांपैकी 21 जागा भाजप व महायुतीतील घटकपक्षांना देऊ केल्या आहेत. तरीही भाजप मित्रपक्षांच्या जागा सोडून 135 जागा हव्यात याच मागणीवर ठाम आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुरुवारपासून महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत.

अमित शहा यांनी तीन जनसभांना संबोधित केले. मात्र, त्यांनी एकाही एकदाही भाषणात युती, महायुती, शिवसेना व इतर छोट्या पक्षांचा उल्लेख केला नाही. त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचेच सरकार येईल असे ठासून सर्व ठिकाणी सांगितले.
मुंबईत भाजपने मोदींच्या नावाने लावलेली पोस्टर्स युती संपुष्टात आल्याचे निदर्शक मानले जात आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तुटी तुटल्याचे अधिकृतरित्या पुढे येईल. मात्र, आमच्यामुळे युती तुटली असे जनसामान्यांना वाटू नये व त्याचा फटका बसू नये, शिवसेना आम्हाला प्रतिसाद देत नसल्याचे कारण सांगून आम्ही आमची तयारी करण्यास सुरुवात असल्याचे वक्तव्य भाजपकडून देण्यात येणार कळते.
युती तुटल्यास राज्याच्या कारणावर काय होतील परिणाम... वाचा पुढे सविस्तर...