आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारीसाठी पती पत्नीत वाद, उमेदवाराने पत्नीला भिरकावून मारला प्रचाराचा नारळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- ठाण्यात शिवसेनेचे उमेदवाराने प्रचाराचा नारळ पत्नीला भिरकावून मारल्याचा धक्कादायक तितकाच गंभीर प्रकार घडला आहे. यात संगीता पाटील या जखमी झाल्या आहेत. त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. माणिक पाटील असे त्यांच्या पतीचे नाव आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, ठाण्यातील प्रभाग 16 मधील (श्रीनगर) शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रभागातील उमेदवार माणिक पाटील, गुरुमितसिंग स्यान आणि डॉ जितेंद्र वाघ उपस्थित होते. तितक्यात माणिक यांची पत्नी आणि शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटील या तिथे पोहोचल्या. 'इतकी वर्षे कुठे होतात?' असा प्रश्न करत माणिक पाटील यांनी संगिता पाटील यांना प्रचाराचा नारळ भिरकावून मारला. यात संगीता पाटील जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. नंतर संगीता पाटील आणि तिचे समर्थक यांनी माणिक पाटील यांच्या विरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

पुढील स्लाइडवर वाचा, पती-पत्नीमधील वाद सर्वश्रृत....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...