आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: राणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांची आतषबाजी, राणे समर्थक- शिवसैनिकांत राडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण राणेंचा पराभव होताच त्यांच्या जुहूच्या घराबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडले. - Divya Marathi
नारायण राणेंचा पराभव होताच त्यांच्या जुहूच्या घराबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडले.
मुंबई- वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय निश्चित झाला आहे. तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंवर 20 हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेताच शिवसैनिकांनी मुंबईतील जुहू येथील नारायण राणेंच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत नारेबाजी केली. शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या तर राणेंच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, राणे समर्थक आणि शिवसैनिकांत राडा झाला असून, राणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढताच पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
वांद्रे परिसरात शिवसैनिकांनी एकच गर्दी करीत नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी राणेंना कोंबडीचोर म्हणत प्रत्यक्ष कोंबड्या आणून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, नारायण राणेंचा पराभव निश्चित झाल्याचे कळताच राणेंचे एकेकाळचे कट्टर सहकारी व पुण्यातील शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी टिळक पुतळा येथे ऊंटावरून साखर वाटली आहे.
पुढे छायाचित्रांच्या पाहा, राणेंच्या पराभवानंतर काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत...
बातम्या आणखी आहेत...