आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Cheif Uddhav Thackeray Reaction After Parties Win

शिवसैनिक वाघ, बेडक्या फुगवून याल तर अंगावर घेऊ- उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसैनिक कधीही माज करीत नाही. तो विजयाने उन्मत होत नाही. बाळासाहेबांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे त्यानुसारच सैनिक वागतात. शिवसैनिक वाघ आहेत, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही पण जर कोणी आमच्यावर धावला तर त्याला आम्ही अंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. बेडक्या फुगवून अंगावर याल तर शिंगावर घेऊ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्यातील विजयानंतर प्रतिक्रिया दिली.
वांद्र्यात शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी विजय मिळविल्यानंतर मातोश्रीवर भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची कन्या होती. तृप्ती सावंत व त्यांच्या कन्येने बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, अनिल परब आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजच्या विजयाने माझ्यासह सर्व शिवसैनिकांना आनंद झाला आहे. विजय हा विजय असतो. मी सर्व वांद्र्यातील लोकांचे व शिवसैनिकांचे आभार मानतो. वांद्रेत बाळा सावंत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे विजय अधिक सुकर झाला. बाळाचा जनसंपर्क उत्तम होता व त्याचाही या निवडणुकीत फायदा झाला. शिवसैनिकांनी समोर तगडा उमेदवार असल्याचे नेटाने प्रचार केला. मुस्लिम लोकांनी आम्हाला मतदान केल्याचे सांगत उद्धव यांनी मुस्लिम लोकांचेही आभार मानले. बाळासाहेब किंवा मी व इतर सेना कधीही मुस्लिमांचा मताधिकार काढा असे म्हणाले नाहीत. मात्र मुस्लिमांची व्होट बॅंक समजून जे राजकारण केले जाते व हिंदूविरोधी वक्तव्ये केली जातात त्यावर कोणी आक्षेप घेत नाही. आम्ही मुस्लिमांना देशातून हाकलून काढा असे कधीही म्हणालो नाही पण औवेसीसारखा माणूस हिंदूंना संपवून टाकू अशी भाषा करतो तेव्हा चर्चा का होत नाही असे उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केले. शरद पवारांनी मला काही दिल्ले होते त्यांनी हे सल्ले असेच देत जावे. त्याचा आम्हाला आतासारखा कायम फायदाच झालेला दिसेल असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपबाबत काहीही मत व्यक्त केले नाही. तृप्ती सावंत यांना भाजपने पाठिंबा दिला होता.
नारायण राणेंविषयी विचारले असता त्यांनी त्यांचे नाव घेणे टाळले. आम्ही कोणाला हरविले याला मी महत्त्व देत आहे. आम्ही जिंकलो हे महत्त्वाचे आहे. समोर कोण होते याला माझ्या लेखी महत्त्व नाही. मात्र जर बेडक्या बुगवून अंगावर याल तर शिवसैनिक वाघ आहेत ते अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे सांगत आमच्या नादाला लागू नका असा अनाहूत सल्ला उद्धव यांनी राणेंना दिला.