आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणींना वाचवणा-या शूर रमेशचा मृतदेह सापडला, उद्धवकडून कुटुंबियांचे सात्वंन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत धाडसी व शूर रमेश वळंजू - Divya Marathi
मृत धाडसी व शूर रमेश वळंजू
मुंबई- वांद्रेतील बँडस्टॅन्डजवळील समुद्रात तीन तरूणीला वाचवताना बुडालेल्या रमेश वाळंजूचा मृतदेह धारावीतील मिठी नदी परिसरातील समुद्रात आढळून आला. रमेशचा मृतदेह ओळखू येत नव्हता मात्र त्याच्या वर्णनानुसार हा त्याचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास वांद्रेतील बँडस्टॅन्ड येथील समुद्रकिनारी सेल्फी काढताना तीन तरूणी समुद्रात पडल्याचे दिसले. त्यावेळी तेथून कामावर चाललेल्या रमेशला ही घटना दिसताच त्याने या तरूणींना वाचविण्यासाठी समुद्रात उडी मारली. रमेशने अंजुम खान (19), कस्तुरी वासीम अली खान (19) या दोन तरूणींना सुमद्रातून बुडताना बाहेर काढले. मात्र, आणखी एक तरूणी तरन्नूम अन्सारी (18) हिला बाहेर काढण्यासाठी तिस-यांदा उडी घेतली. मात्र, त्याच वेळी समुद्रात भरतीची लाट आली व रमेशला लाटांनी समुद्रात खेचून घेतले. त्यामुळे रमेश व तरन्नूम दोघेही समुद्राच्या आत ओढल्याची भीती होती.
या घटनेनंतर पोलिस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी शनिवारी दिवसभर शोधमोहीम राबवली. रविवारी सकाळी पोलिसांनी समुद्र किना-यावर जाऊन पाहणी केली, मात्र रमेश आणि तरन्नूम यांचा शोध लागला नाही. अखेर सोमवारी दुपारी रमेशच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारा मृतदेह धारावीतील समुद्रकिनारी आढळून आला.
उद्धव ठाकरेंनी घेतली रमेशच्या कुटुंबियांनी भेट-
रमेश वाळंजू हे शिवसैनिक होते. रमेश यांनी दाखवलेल्या बहादुरीने त्यांच्या धाडसाचे कौतूक होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रविवारी रमेश वाळंजू यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असे सांगत पत्नीला नोकरी देण्याचे व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लागलीच शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. आज दुपारी दोनच्या सुमारास उद्धव ठाकरेंनी रमेशच्या घरी त्यांच्या जाऊन कुटुंबियांचे सात्वंन केले. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. तुम्हाला काय मदत हवी ते सांगा असे उद्धवनी सांगितले. त्यावर रमेशच्या आईने माझा पोरगं तेवढं आणून द्या अशी आर्त मागणी केली. यावर 'चमत्कार होवो अन् रमेश घरी येवो' अशी प्रार्थना उद्धव यांनी केली.
रमेशला शौर्यपदक द्या- शिवसेना
रमेश वळंजू यांच्या जिगरबाज शौर्याबद्दल सरकारने त्यांचा शौर्यपदक देऊन गौरव करावा अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी केली आहे. तसेच रमेश यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत आणि सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी रावलेंनी केली आहे. रमेश वाळंजू हे रत्नागिरीतील राजापूरचे होते. रमेश यांच्या मागे आई, पत्नी कल्पना, मुलगी रविना (15) आणि मनश्री (12) आणि अडीच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
पुढे पाहा....
बातम्या आणखी आहेत...