आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडक्या फुगवून अंगावर येऊ नका, ‌उद्धव ठाकरेंचा नारायण राणे यांना टाेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत कुणाचा पराभव झाला हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. उलट हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील शंभर टक्के निष्ठेचा हा विजय आहे. मी कधीच काेणाचे वाईट चिंतत नाही. कायम सकारात्मक विचार करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. मात्र बेडक्या फुगवून उगाच कुणी अंगावर येऊ नये, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.

बुधवारी शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केल्यामुळे उद्धव ठाकरे अाज प्रचंड खुश हाेते. ‘आधी मी आमच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचे मनापासून अभिनंदन करतो. आमच्या बाळा सावंत यांचे निधन झाल्यानंतर स्वत:ला सावरून त्या निवडणुकीला सामोरे गेल्या, हे विशेष. हा त्यांच्या मेहनतीचा विजय तर आहेच, पण, त्याहून तो शिवसैनिकांचा अाणि मतदारांचा अाहे. बाळा सावंत यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर राहील, असे उद्धव म्हणाले.

‘ताकद नसताना उगीच बेडक्या फुगवून अंगावर कुणी येऊ नये. अशांची हालत काय होते, ते िदसून आले अाहे. खास म्हणजे शिवसैनिकांची ताकद त्यांना कळून आली असेल. तसेच एमआयएमने मुस्लिमांना भडकवून जे काही राजकारण केले, त्यालाही नाकारले गेले आहे’, असे उद्धव म्हणाले.

पवारांच्या सल्ल्याचा उपयोग होतो!
मला सल्ले देत जा, त्याचा मला उपयोग होताे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला मारला. ‘ बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मर्दांची होती. पण, त्यांच्या वारसांनी शान घालवली’ अशी टीका पवारांनी प्रचारादरम्यान केली हाेती.