आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Compares Gujrati Businessmen With Prostitutes

गुजरातींनी मुंबईला वेश्येसारखे ओरबडले- शिवसेनेची टीका; उद्धव यांची सारवासारव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडताच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्या मूळ स्वभावाकडे येत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'गुजरातीं'वर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनात महाराष्ट्र दिनानिमित्त लिहलेल्या अग्रलेखात गुजराती समाज महाराष्ट्रमय झाला नसल्याचे सांगत कोरडे ओडले आहेत. गुजराती समाज मोदींसाठी जसा एकत्र झाला तसा महाराष्ट्र दिनी का होत नाही व ते महाराष्ट्र दिन साजरा का करीत नाहीत, असा सवाल विचारला आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी-गुजराती बांधवांनी एकझूठ कायम ठेवावी, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र दिन दणक्यात साजरा केला जातो. मराठीचा गर्व असलेल्या व त्याआधारित राजकारण करणा-या शिवसेनेसाठी हा दिन तर सणच असतो. अशावेळी शिवसेनेने आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपला व गुजराती समाजाला लक्ष्य केले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना मानवंदना देण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपले महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यासाठी 105 हुतात्म्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली. महाराष्ट्रासाठी झालेल्या बलिदानांवर श्रद्धा असलेला सामान्य मराठी माणूस या दिवशी 105 हुतात्म्यांचे स्मरण करील; पण मलबार हिल, वाळकेश्‍वर, कफ परेड, कुलाबा, जुहू भागात राहणारे ‘धनवान’ लोक महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात कधीच सामील झाले नाहीत. मुंबईत राहून त्यांनी सत्तासंपत्तीचा भोग घेतला. संपत्तीचे इमले बांधले. मुंबईस तजेलदार वेश्येप्रमाणे वापरले. जे येथे हाती लोटा घेऊन आले त्यांनी मुंबई, महाराष्ट्राला शोषून स्वत:च्या सोन्याच्या द्वारका उभ्या केल्या व मुंबईतील पैशांच्या जोरावर हे सर्व उद्योगपती देशातील सत्तेचा सारीपाट मांडून बसले आहेत, असे म्हणत व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या गुजराती समाजाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या अजेंड्यावर गुजराती न आले तरच नवल!
पुढे वाचा, शिवसेनेने कोणा-कोणावर हल्लाबोल केला आहे...