आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena, Congress , Nationalist Congress Fragmented Om OMS

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसला मनसेने पाडले खिंडार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न मनसे प्रमुख राज ठाकरे करत असून सोमवारी त्याचा प्रत्यय दिसून आला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे या वेळी शिवसेनेच्या उपनेत्यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेतृत्वावर टीका केली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्याचाच परिणाम म्हणून दसरा मेळाव्यातून त्यांना पिटाळून लावण्यात आले. मात्र, सोमवारीही शिवसेनेचे दोन उपनेते राजा चौघुले (माजी नगरसेवक) व संजय घाडी यांनी शिवसेना फक्त वापरून घेत असल्याचा आरोप करत मनसेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेच्या एअरपोर्ट युनियनचे नितीन जाधव यांनी एअरपोर्टमधील सर्व युनियनसह मनसेत प्रवेश केला, तर पुण्यातील सेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनीही राज ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले.


नवाब मलिक यांचे बंधूही मनसेत
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे बंधू, माजी नगरसेवक कॅप्टन मलिक, पुण्याचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे, परिक्षित थोरात आणि कॉँग्रेसचे नारायण गलांडे, माजी नगरसेवक क्लाइव्ह डायस यांनी मनसेत प्रवेश केला.