आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Continues Critcis Againest Modi Through Saamana

\'प्रधान सेवका\'चा सम्राट कसा होतो हे सर्वांनीच अनुभवले- उद्धवची मोदींवर पुन्हा टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देतानाच केजरीवालांना सल्लाही देत मागील काळात केलेल्या चुका टाळाव्यात असे म्हटले आहे. मात्र, याच केजरीवालांना दिलेल्या सल्ल्याच्या आडून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
नरेंद्र मोदी हे स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेत आहेत. केजरीवाल स्वत:चे नवे बारसे काय करून घेतात ते आता पाहायचे. राजकारणात येताना आणि निवडणुका लढवताना प्रत्येक जण जनतेचा सेवक असतो. त्या सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो ते जनतेने अनेकदा अनुभवले आहे, अशा शब्दात मोदींवर शरसंधान साधले आहे. आपला समाज अनुकरणवादी आहे. त्यामुळे राजकारणातील ‘हीरों’नी प्रत्येक पाऊल जपून टाकावे. ‘सेवक’ सगळेच आहेत. त्या सेवक‘पणा’चा अतिरेक होऊ नये, असे सांगत केजरींनी आगामी काळात नौटंकी न करता शपथ घ्या व कामाला लागा असा सल्ला दिला आहे.
पुढे ठळक मुद्यांद्वारे वाचा, सामनाच्या अग्रलेखात नेमके काय काय म्हटले आहे...
- केजरीवाल यांनी मागच्या वेळेस जाहीर केले होते की, त्यांचे मंत्री लाल दिव्याच्या गाड्या व इतर सुविधा घेणार नाहीत, मेट्रोने प्रवास करतील, प्रत्यक्षात काय झाले?
- मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने प्रसिद्धीसाठी हे असले ‘स्टंट’ करू नयेत व ज्या काही राजशिष्टाचाराच्या बाबी आहेत त्यांचे पालन करावे.
- केजरीवाल यांनी जाहीर केले की, ते मुख्यमंत्री म्हणून ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था घेणार नाहीत, पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय ते स्वत: घेऊ शकत नाहीत.
- ज्योती बसू, बुद्धदेव भट्टाचार्य हेसुद्धा साधेपणाने राहत व सरकारी बंगले त्यांनी घेतले नव्हते. ममता बॅनर्जी यासुद्धा साधेपणाच्या बाबतीत आदर्श आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्रीही साधेपणाचे आदर्श उदाहरण आहेत व ते अनेकदा सायकलीने प्रवास करतात. त्यामुळे गाजावाजा न करणारे जनतेचे सेवक देशाच्या राजकारणात आजही आहेत व ते सर्वच पक्षांत आहेत. साधेपणा व प्रामाणिकपणाचा अहंकारही वाईटच असतो.
- ओबामा दिल्लीत आले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी 30-35 लाखांचा ‘ब्रॅण्डेड’ कोट घातल्याची चर्चा मीडियात रंगली. उद्या केजरीवाल यांचा मफलरही ‘ब्रॅण्डेड’ होऊ नये, केजरीवाल मफलर गुंडाळतात म्हणून फॅशन कंपन्यांनी ‘ब्रॅण्डेड’ मफलर बाजारात आणून स्वत:चे खिसे भरू नयेत आणि दिल्लीसह देशात मफलर गुंडाळून राजकारण करणार्‍यांची लाट येऊ नये. कारण आमच्या देशात कधी कसली लाट येईल व त्या लाटेत कोण कसे वाहून जाईल ते सांगता येत नाही.
- जनता हीच जनार्दन आहे. तेव्हा जनता आपल्याच पाठीशी आहे या अहंकारातून सगळ्यांनीच बाहेर यावे. रामलीला मैदानावरील शपथविधी कार्यक्रमास आमच्या शुभेच्छा! शपथ घ्या आणि राज्य करा एवढेच आमचे सांगणे आहे.