आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Corpoter Shital Mahtre Gets U Turn In 24 Hour

विनोद घोसाळकरांविरूद्ध तक्रार दाखल करा, शीतल म्हात्रेंचे दहिसर पोलिसांना निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी 24 तासांत यू-टर्न घेतला असून, आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून, मी सविस्तर माहिती दिली आहे असे सांगत म्हात्रे यांनी बंडाची तलवार म्यान केली आहे. दरम्यान, ज्या स्थानिक आमदारावर म्हात्रे यांनी आरोप केले आहेत त्या विनोद घोसाळकर यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एक चौकशी समिती नेमून सविस्तर चौकशी करावी. मी जर दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी दर्पोक्तीही घोसाळकर यांनी केली आहे. दरम्यान, शीतल म्हात्रे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेविका अजंता यादव यांनी दहिसर पोलिसांनी निवेदन देऊन घोसाळकर यांच्याविरोधात तक्रार करावी असे म्हटले आहे.
शिवसेनेच्या नेत्या व आमदार नीलम गो-हे नगरसेविका शीतल म्हात्रे यांची भेट घेणार आहेत. त्याआधी काल रात्री उद्धव यांचे सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी म्हात्रे यांची भेट घेऊन चर्चा केली. राजीनामा देऊन काहीही साध्य होणार नाही. पदावरून राहवूनच कोणत्याही मुद्यांवर भाष्य करणे योग्य ठरेल. पक्षनेतृत्त्व तुमच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर म्हात्रे यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. माझ्याकडे नगरसेविका हे केवळ एकच पद असल्याने या पदावर राहूनच माझी लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा, घोसाळकरांबाबत घाडी दांपत्याने केली होती तक्रार...