आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Critcis Congress & Cm Prithviraj Chavan

सोनियांची \'कारकुनी\' करणा-या \'पृथ्वीबाबां\'नी अनुभवाचे ढोल बडवू नयेत- शिवसेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आज तक कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे)
मुंबई- उद्धव ठाकरेंना राजकारणातील कोणताही अनुभव नाही. त्यामुळे ते चांगले मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, अशी जाहीर टिप्पणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर शिवसेनेने सामनातून काँग्रेससह राजीव गांधी, राहुल गांधी व खुद्द मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत सोनियांच्या दरबारी 'डेस्क ऑफिसर' म्हणून 'कारकुनी' करणा-या चव्हाणांनी अनुभवाचे ढोल वाजवून स्वत:चे हसे करून घेऊ नये, असे सुनावले आहे.
‘आज तक’ने आयोजित केलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीच्या पंचायत या कार्यक्रमात शनिवारी उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेची इच्छा असल्यास मला मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे अननुभवी असल्याने लोक त्यांना स्वीकारणार नाहीत अशी खोचक टिप्पणी केली होती. त्यावर शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मानसिक अवस्था या घडीस अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तशीच झाली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षाही राज्यातील भ्रष्ट नादान कॉंग्रेसला कसे धक्के मारून घालवता येईल हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला खुर्चीची हाव नाही, पण कोणत्याही जबाबदारीपासून पळण्याचा आमचा स्वभाव नाही. राज्याच्या जनतेने ठरवलेच तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही घ्यायला आम्ही तयार असल्याचे मत आम्ही मांडले व त्यामुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या. चव्हाण यांनी ‘उद्धव यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, असे भाष्य केले. पृथ्वीराजबाबांचे हे विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ याप्रमाणे आहे. स्वत: पृथ्वीराजबाबा सातारा-कराड परिसरात सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. मात्र असा अतिसुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्याने त्यांचे मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनले आहे, अशी टीका केली आहे.
पुढे वाचा, शिवसेनेने राजीव गांधी, राहुल गांधीवर कशा प्रकारे केली आहे टीका...