आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsena Critics Modi Govt. For Increases Railways Frieght

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेची भाडेवाढ करून मोदींनी विरोधकांच्या हातात दिले आयते कोलीत- शिवसेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर महागाईच्या उसळत्या आगडोंबावर पाणी ओतले जाईल असे लोकांना वाटले होते व त्याच हेतूने जनतेने काँग्रेसचे सरकार घालवून मोदी यांचे नवेकोरे सरकार दिल्लीत आणले. पण मोदी सरकारने रेल्वे भाडेवाढीची कुर्‍हाड कोसळल्याने हाहाकार माजला आहे. असे करून मोदींनी विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. तसेच ही भाडेवाढ शेवटची ठरो, जनतेची तीच अपेक्षा आहे आणि ही अपेक्षापूर्ती सरकारने करायलाच हवी असेही अग्रलेखात म्हटले आहे.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी प्रवासी भाड्यात साधारण 14.5 टक्के तर मालवाहतूक भाड्यात साडेसहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकर उपनगरी प्रवाशांवर तर 100 टक्केपेक्षा जास्त दरवाढ लादली आहे. ही वाढ लगेच अमलात येत असल्याने देशभरातील सामान्य प्रवाशांबरोबरच मुंबईच्या उपनगरीय प्रवाशांनाही दरदरून घाम फुटला आहे. रेल्वेचा अर्थसंकल्प अद्याप सादर व्हायचा आहे. त्याआधीच सामान्य प्रवाशांच्या खिशात हात घालून पाकीट मारल्याने देशभर मोदी सरकारच्या विरोधात सूर उमटला आहे. राज्यातील एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही रेल्वेवाढ मान्य नसल्याचे म्हटले आहे. याबाबत आज सामनाच्या अग्रलेखात त्यांनी रेल्वे दरवाढीला विरोध करतानाच रेल्वेची स्थितीवर भाष्य केले आहे. तसेच ही भाववाढ शेवटची ठरावी अशी अपेक्षा व्यक्त करीत मोदी सरकार व भाजपवर कटाक्ष टाकला आहे.
पुढे वाचा, भाजप व मोदींवर शिवसेनेने कोणत्या शब्दात केली आहे टीका...