आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडे आशेने पाहू नये; युती करण्यास आता रस नसल्याचा भाजपला \'सामना\'तून निरोप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर जे घडले त्यावर चिंतन आणि मंथन करण्याची आम्हांस गरज नाही, पण आत्मक्लेशाची वेळ ज्यांनी महाराष्ट्रावर आणली त्यांनी यापुढे शिवसेनेकडे आशेने पाहू नये, असे सांगत आता भाजप व फडणवीस सरकारमध्ये सामील होण्यास रस नसल्याचे शिवसेनेने 'सामना'तून भाजपला निरोप दिला आहे. शिवसेना हत्तीच्या चालीने पुढे जात राहील. शिवसेनेच्या 63 निखा-यांचा (आमदार) अंगार महाराष्ट्राला उज्ज्वल करील, असेही सामनात म्हटले आहे.
भाजप व शिवसेना हे दोन मित्रपक्ष आज राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधी पक्षात आहेत. मात्र, भाजप व शिवसेनेच्या संभाव्य युतीबाबत भाजपने प्रयत्न केल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसापासून येत आहेत. भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप-सेनेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. यावर शिवसेनेने आजच्या सामनात अग्रलेख लिहून शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत जाण्यास रस नसल्याचाच निरोप दिला आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, कदाचित सामनातील भूमिकेनंतर भागवत यांनी मुंबई दौरा रद्द केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भागवत सध्या बंगलोरमध्ये असून आता ते थेट दिल्लीला जाणार आहेत.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, लोकसभेच्या निवडणुकीत काय झाले आणि विधानसभेच्या निवडणुकीत काय व कसे घडले याचा फालतू विचार करण्यास आम्हाला वेळ नाही. कोणी काहीही म्हणोत, पण महाराष्ट्रात सध्या अवतरलेल्या नव्या युगाची वगैरे जी काही अफाट सुमने उधळली गेली, त्या सुमनांचा कचरा विधानसभा विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारला गेल्या पंधरा वर्षांत जेवढ्या शिव्या पडल्या नसतील त्यापेक्षा जास्त शिव्या नव्या सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाचा तमाशा संपल्यावर पडल्या. जनतेच्या स्वप्नांचा, आशाआकांक्षांचा हा जो कचरा पहिल्याच आठवड्यात झाला तो कचरा कोणत्या झाडूने साफ करणार? या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्राच्या अस्मितेचाच कचरा झाला आहे. या कचर्‍यातून मोती वेचायचे आहेत व महाराष्ट्राच्या गळ्यात स्वाभिमानाचा तेजस्वी हार घालायचा आहे. राज्यात सत्ताबदल झाला आहे, पण त्या सत्तेचा टेकू राष्ट्रवादीच्या भ्रष्ट बांबूंचा असल्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशात आज तरी सामसूम दिसते आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र तेजाचे दिवे मंदावत असताना आणि राज्यात राजकीय आचार विचारांचा चोथा झाला असताना ज्याच्याकडे आशेने पाहावे असा एकतरी नेता उरला आहे काय? मोदींना खूश करण्यासाठी बारामतीच्या शरदबाबूंनी हाती झाडू घेतला, पण शेवटी त्यांनी साफ काय केले? हा प्रश्‍न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहेच. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अर्धा डझन भाजप मंत्र्यांनी शपथ घेतली, पण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पाहण्याचा अधिकार त्यांना खरोखरच मिळाला आहे काय? कॉंग्रेजी राजवट गेली तरी महाराष्ट्राचा एक पाय आजही दिल्लीच्या दगडावरच आहे. मग सत्तापरिवर्तन करून महाराष्ट्राने मिळवले काय? राज्यात काय व कसे करायचे याचे निर्णय नव्या सरकारला उद्योगपती, व्यापार्‍यांच्या संमतीनेच घ्यायचे आहेत व दिल्लीच्या मंजुरीने ते अमलात आणायचे आहेत, अशी टीका सामनातून भाजपवर केली आहे.
पुढे आणखी वाचा, कोणत्या शब्दांत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे...