आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची स्वबळाची भाषा म्हणजे अधू मेंदूचे लक्षण- सेनेची \'सामना\'तून टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)
मुंबई- आगामी विधानसभेच्या निवडणुकीला तीन महिने राहिले असताना स्वबळाची भाषा करणा-या भाजपला शिवसेनेने 'सामना'च्या माध्यमातून टोले लगावले आहेत. महाराष्ट्राचे नुकसान करणारे ‘अधू’ विचार शिवसेनेने कधी मांडले नाहीत. आता भाजपची स्वबळाची भाषा ही अधू मेंदूचे लक्षण आहे. आता निवडणूकीच्या तोडांवर तर अधू मेंदूंना झटके येतच राहतील. मात्र अशा झटक्यांना विचारतोय कोण? महायुतीत सर्व काही आलबेल आहे. तसेच विधानसभेवर महायुतीचा ‘भगवा’ झेंडाच फडकणार आहे! असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.
सामनाच्या शनिवारच्या अग्रलेखात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील युत्या, आघाड्या, इतर स्वतंत्र राजकीय पक्षातून आरोळ्या, किंकाळ्या तर कुठून कण्हण्याचे आवाज येऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जसे लागायचे तसेच लागले आहेत. मतदार राजा हा हुशार असतो, त्याची चुणूक त्याने लोकसभा निवडणुकीत दाखवलीच आहे, पण जनतेला प्रत्येक वेळी गृहीत धरून चालत नाही म्हणूनच भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना परखडपणे बजावले आहे, ‘‘बाबांनो, लोकसभेच्या यशाने हुरळून जाऊ नका. पाय जमिनीवर ठेवा!’’ शिवसेनेचा 18 जागांवर विजय होताच जल्लोषी वातावरण राज्यात झाले. ढोल, ताशा, बेन्जो पार्ट्या, घोषणा, गर्जनांचा जयजयकार सुरू होताच आम्हीही शिवसैनिकांना विजयापुढे विनम्र व्हा असेच सुचवले. ‘‘या विजयाने उतू नका, मातू नका,’’ असेच बजावले. कारण उतणार्‍यांना, मातणार्‍यांना जनतेने धडा शिकविल्यामुळेच ‘मोदी’ विजयाची पताका राज्यात व देशभरात फडकली, पण आम्ही व भाजपचे मोठे नेते हा विचार करतात तेव्हा अनेकांच्या डोक्यातील अधू मेंदू भलत्याच दिशेने भरकटत असतात, अशी टीका मधू चव्हाण यांच्यासह स्वबळाची भाषा बोलणा-यांवर केली आहे.
आणखी पुढे वाचा, शिवसेनेने कमळाबाई भाजपवर काय काय टीका केली ते...