आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबनीसांना भाजपचा विरोध हे झुंडशाहीचे श्रीखंडी स्वरूप- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांना व पाक कलाकारांना आम्ही विरोध केला की भाजपला आमची ही झुंडशाही वाटते मग आता श्रीपाल सबनीस यांना विरोध करून त्यांचे पाय तोडण्याचे व जीवे मारण्याची धमकीनंतर जे काही सुरु आहे ते झुंडशाहीचे श्रीखंडी स्वरूप आहे अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात यावर भाष्य करून सोयीने भूमिका घेणा-या भाजपवर टीका केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या मुंबई भेटीस शिवसेनेने विरोध केला व कसुरी यांच्या निमित्ताने पाकड्यांना पायघड्या घालणार्‍याचे तोंड काळे केले त्यावेळी शिवसेनेने हे कसे केले, ही तर झुंडशाही झाली, हे सहन करणार नाही, अशी मुक्ताफळे भाजपने उधळलेली होती. मुख्यमंत्र्यांनी पाकड्यांच्या संरक्षणासाठी कंबर कसली होती. आम्ही तर देशावर आक्रमण करणार्‍या व हिंदुस्थानचे तुकडे पाडण्याचे स्वप्न पाहणार्‍या पाकिस्तानी लोकांना विरोध केला. ती भाजपला झुंडशाही वाटली, मग सबनीस यांच्या निमित्ताने जे सुरू आहे ते झुंडशाहीचे श्रीखंडी स्वरूप आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी सामनात मांडले आहे.
गुलाम अलीसारख्यांना संरक्षण देण्यासाठी आकाशपाताळ एक करू असे महाराष्ट्राचे सरकार सांगत होते व गुलाम अलीस पळवून लावल्याचे दु:ख दिल्लीश्‍वरांनाही झालेच होते. शिवसैनिकांनी काही कुणाच्या तंगड्या वगैरे तोडून हातात देण्याची भाषा केली नव्हती. देशाच्या दुश्मनांना येथे पायघड्या घातल्याचा तो संताप होता. आता सबनीस यांच्याबाबतीत भाजप तेच करीत होते. फरक इतका की, आम्ही देशप्रेमासाठी केले व भाजप मोदीप्रेमासाठी करीत आहे. तरीही गुलाम अली व कसुरीप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांच्या तंगड्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक अजरामर वाक्य लेखकांच्या बाबतीत आहे. ते म्हणजे, ‘लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या!’ आता पिंपरीच्या संमेलनात, ‘अध्यक्षांच्या तंगड्या मोडा व कायदा हाती घ्या!’ असा पुकारा झाला आहे. आई जगदंबे, सबनीसांच्या तंगड्यांचे रक्षण कर, अशी टीका अग्रलेखात केली आहे.
पुढे आणखी वाचा, श्रीपाल सबनीस यांच्यावर कशा शब्दांत केली आहे 'सामना'त टीका...