आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Critics On Congress & Court Process In Saamana

\'राजीव गांधींच्या मारेक-यांना न्याय मग सुरेश जैन, साध्वी-पुरोहितला का नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जी न्यायालये शाळेच्या प्रवेशांपासून ते नवरा-बायको, सासू-सुनांच्या भांडणांपर्यंत आपले शेरे-ताशेरे उडवीत असतात तीच न्यायालये देशाच्या इतिहासातील सर्वात घोर अन्यायाच्या प्रकरणांवर ‘मूकबधिर’ बनली आहेत. राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना ‘न्याय मिळतोय,’ पण सुरेश जैन, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाला तोच न्याय मिळू दिला जात नाही, हा कसला कायदा? हा कसला न्याय? आणि ही कसली सरकारे?, असे फटकारे मारत शिवसेनेने सरकार व न्यायालयीन प्रक्रियेवर आसूड ओडले आहेत.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे, की राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना फाशीऐवजी जन्मठेप देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचे खापर केंद्र सरकारवर फोडण्यात आले आहे. हिंदुस्थानातील न्याय यंत्रणा किती ढिसाळ आहे व एखादा राजकीय सम्राट किंवा सम्राज्ञीची मर्जी झाली म्हणून महत्त्वाच्या निकालांवर कसे परिणाम होतात त्याचे उदाहरण म्हणजे हे राजीव गांधींचे फाशी प्रकरण. राजीव यांच्या मारेकर्‍यांच्या दया अर्जावर निर्णय घेण्यात सरकारने दिरंगाई केली हे कारण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना 11 मे 1999 रोजी फाशीची शिक्षा झाली. त्यानंतर संथान, मुरुगन व पेरारीवलन या तिघांनीही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. हा दयेचा अर्ज तब्बल दहा वर्षे पडून राहिला. त्यामुळे आपल्या जगण्याच्या हक्कावर गदा येत असल्याची याचिका या तिघांनी केली. सर्वोच्च न्यायालयानेही मानवता व जगण्याचा हक्क अशा गोंडस नावाखाली फाशीऐवजी जन्मठेप देऊन टाकली. याचा अर्थ एकच तो म्हणजे कॉंग्रेस व सोनिया गांधींनाच या मारेकर्‍यांना दया दाखवायची होती. या काळात प्रियंका गांधी या तुरुंगात जाऊन आपल्या पित्याच्या मारेकर्‍यांना भेटून आल्या. त्या कशासाठी? ‘‘मारेकर्‍यांनो, तुम्ही आमच्या वडिलांना का मारलेत?’’ असा प्रश्‍नही प्रियंकाने विचारला. तुरुंगात जाताना प्रियंकाने या मारेकर्‍यांसाठी घरच्या जेवणाचा डबा वगैरे नेला होता काय किंवा थंडीचा त्रास होऊ नये म्हणून लोकरीचे कपडेही नेले होते काय, ते पाहावे लागेल. कारण पित्याच्या मारेकर्‍यांना जगण्याचा हक्क द्यायचा म्हटल्यावर सर्व रीतीरिवाज पाळलेच असतील, अशी टीका सोनिया व प्रियंकाच्या नलिनीच्या भेटीबाबत केली आहे.
आणखी पुढे वाचा, न्यायालयीन प्रक्रियेवर केलेली जळजळीत टीका...