आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Critics On Congress Over On Issue Of Modi\'s Marriage

मोदींच्या लग्नाच्या भानगडीत न पडता आधी राहुलबाबांना बाशिंग बांधा- सेनेचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात प्रथमच पत्नी जशोदाबेन यांचा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसने त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिवसेनेने मोदींच्या बाजूने वकीली करीत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या पत्नी जशोदाबेन मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी उपास-तापास करीत आहेत. पण काँग्रेसवाल्यांच्या बायका देश काँग्रेसमुक्त व्हावा यासाठी देव पाण्यात घालून बसल्या आहेत. मोदी हे कायद्याच्या कचाट्यात सापडतील असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात रांगत आहेत. आधी राहुलबाबांना बाशिंग बांधा व मग मोदींच्या लग्नाची चर्चा करा, असे सेनेने काँग्रेसला डिवचले आहे.
शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रात अग्रलेख लिहून मोदींच्या लग्नाचे राजकारण करणा-या काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्यात म्हटले आहे की, कॉंग्रेसच्या राजकीय गुंडांनी व पुढार्‍यांनी आतापर्यंत असंख्य महिलांना फसवले आहे. अनेक अबलांचे आयुष्य नासवले आहे. लग्नाची आमिषे व पदांची भूल देऊन अनेक महिलांना ठकवले आहे. महिलांवरील बलात्कार, अत्याचार व खुनांच्या प्रकरणांत अनेक कॉंग्रेसवाले देशातील तुरुंगांमध्ये वळवळत आहेत. कॉंग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचार व व्यभिचाराचे गटार आहे व तेच कॉंग्रेसवाले आज नरेंद्र मोदी यांच्या लग्नावरून व त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्यावरील तथाकथित अन्यायावरून बाह्या सरसावीत उभे राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढण्यासाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जात आपण विवाहित असल्याचे सांगितले आहे. मात्र या आधी त्यांनी लढवलेल्या निवडणुकांत जी प्रतिज्ञापत्रे सादर केली त्यात विवाह झाल्याचा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे मोदी यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी कॉंग्रेसच्या वकिलांनी प्रयत्न चालवले आहेत. ज्या कॉंग्रेजी युवराजांना अद्यापि स्वत:चे लग्नकार्य करता आले नाही व ज्यांच्या मुंडावळ्या सुकून गेल्या आहेत अशी टीका अग्रलेखात केली आहे.
पुढे वाचा, आधी राहुलबाबांना बाशिंग बांधा...