आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रीमंडळ विस्तार म्हणजे नुसते पत्ते पिसण्याचेच काम- उद्धव ठाकरेंचा घाणाघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार झाला आहे. तीन वर्षांनंतरही मंत्रिमंडळात प्रयोग सुरू आहेत. मंत्रिमंडळाचे विस्तार म्हणजे पत्ते पिसण्यासारखेच असतात. कधी एखादा जोकर किंवा गुलाम राजा होईल व राजाची अवस्था गुलामासारखी होईल ते सांगता येत नाही. नव्या विस्ताराबाबतही यापेक्षा वेगळे काही घडल्याचे दिसत नाही. थोडक्यात मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव संपला आहे. त्यावर फार चर्चा न केलेली बरी!, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घाणाघात केला आहे.
 
केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात आला. यात नरेंद्र मोदींनी शिवसेनेसह इतर घटकपक्षांना कोणतेही स्थान दिले नाही. या विस्तारात शिवसेनेला एक-दोन मंत्रीपदे अपेक्षित होती. मात्र, भाजपकडून याबाबत कोणतेही विचारणा झाली नाही. त्यामुळे शिवसेनेनेही यावर 'वेट अॅंड वॉच' धोरण घेतले. तसेच उद्धव ठाकरेंनी आम्ही मंत्रीपदासाठी लाचार नाही असे सांगत भाजपकडे कटोरा घेऊन जाणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होताच मोदींनी केलेल्या बदलांनंतर शिवसेनेने आपली भूमिका मांडत भाजपवर शरसंधान साधले आहे. मंत्रिमंडळाचा नुसताच गाजावाजा झाला मात्र फार काही वेगळे घडले नाही. निर्मला सीतारामन यांना संरक्षण तर पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्री खाते देण्याव्यतिरिक्त फार काही घडले नाही असे सांगत सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले आहे.
 
अग्रलेखात म्हटले आहे की, नव्या विस्तारात १३ मंत्र्यांची उलथापालथ झाली आहे. नऊ नव्या मंत्र्यांना हळद लावली असून त्यात चारजण माजी नोकरशहा आहेत. धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे, तर नऊ नवे राज्यमंत्री घेण्यात आले. त्यात आर. के. सिंग हे माजी केंद्रीय गृहसचिव व डॉ. सत्यपाल सिंह या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. अल्फोन्स कन्ननथनम व हरदीपसिंग पुरी या निवृत्त नोकरशहांनाही सरकारात सामील केले आहे. मोदी व अमित शहा या दोघांनी मिळून जे ठरवले तेच नव्या यादीत अवतरले व तेच राष्ट्रपती भवनात शपथविधीसाठी पोहोचले. २०१९ ची ही तयारी वगैरे असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुका जिंकणे व सरकारे बनवणे हाच सध्या राजकीय, पण राष्ट्रीय खेळ झाला आहे, अशा शब्दात या फेरबदलावर उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर शरसंधान साधले आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सुरेश प्रभूंबाबत काय भाष्य केले आहे अग्रलेखात...
बातम्या आणखी आहेत...