आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी म्हणजे महाराष्ट्राचे रक्त शोषणारी गोचीड- शिवसेनेचा पवारांवर हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचे रक्त शोषणारी गोचीड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम आहे. एकवेळ रक्त शोषून गोचिडीचे पोट भरेल, पण महाराष्ट्राचे रक्त शोषून राष्ट्रवादी व शरद पवारांचे पोट भरलेले नाही. त्यामुळेच 'मराठी' जनतेने या गोचिडीस शेवटी ओढून काढले व पायाखाली चिरडले आहे. पण पवारांचे 'जलबिन मछली व नृत्यबिन बिजली' सारखे आहे. सत्तेशिवाय त्यांचे सारे जीवन व्यर्थ आहे. सत्ता नसल्याने त्यांचा कोंडमारा होत आहे. त्यांच्या कोंडमा-यावर उतारा शोधावा लागेल, पण तोपर्यंत राष्ट्रवादीने पवारांचे मन रमावे व त्यांचा श्‍वास मोकळा व्हावा यासाठी 'मुंगळाऽऽ मुंगळाऽऽ' हे गीत वाजवत राहावे, अशा शब्दात शिवसेनेने सामनातून पवारांवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी शिवसेना हा सत्तेच्या गुळाला चिकटलेला मुंगळा आहे. ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत. ज्यांनी सरकार स्थापन केले त्यांनाच राजीनामा देण्यास सांगत आहेत त्यावरून शिवसेना सत्तेला कशी हापापली आहे अशी खोचक प्रतिक्रिया पवारांनी दिली होती. त्याला शिवसेनेने आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्त्युत्तर दिले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, शरद पवार यांनी मुंबईत येऊन हवा सोडली आहे, पण पवारांनी सोडलेल्या हवेत कायम दुर्गंधीच असल्याने ‘चला, ही हवा जाऊ द्या!’असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादीचा रंगमंच हा मागच्या निवडणुकीत जनतेने साफ मोडून तोडून टाकला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पवार व त्यांच्या राष्ट्रवादीस जनतेने तुडवले. खुद्द बारामतीत महादेव जानकर या नवख्या उमेदवाराने पवारांच्या वारसदारांना घाम फोडला होता. तेव्हापासून पवारांना मुंगळे चावून चावून बेजार करीत आहेत. आता महाराष्ट्रातील गुळाची ढेप म्हणजे नेमके कोण, हे आम्ही नव्याने सांगायला नको. दुसर्‍यांना मुंगळे वगैरे म्हणण्याआधी पवारांनी आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने कोणत्या शब्दांत शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.....